35.4 C
New Delhi
Tuesday, June 23, 2026
Homeमाहिती तंत्रज्ञानअझीम प्रेमजी विद्यापीठाकडून पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

अझीम प्रेमजी विद्यापीठाकडून पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

पुणे,-अझीम प्रेमजी विद्यापीठाने त्यांच्या बंगळूरु, भोपाळ आणि रांची येथील कॅम्पसमध्ये आगामी शैक्षणिक वर्षासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया जाहीर केली आहे. या अभ्यासक्रमांसाठी इच्छुक असणाऱ्यांना २२ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

विद्यापीठामध्ये शिक्षणशास्त्र, विकासशास्त्र, पूर्व प्राथमिक शिक्षण (अर्ली चाइल्डहूड एज्युकेशन), अर्थशास्त्र, उपयोजित अर्थशास्त्र, सार्वजनिक आरोग्य आणि हवामान बदल व शाश्वतता या विषयांत पदव्युत्तर पदवी घेता येईल. कॅम्पसनुसार हे अभ्यासक्रम अशा विद्यार्थ्यांसाठी तयार केले गेले आहेत, ज्यांना भक्कम शैक्षणिक पाया रचण्याबरोबरच समकालीन सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय आव्हानांचा सखोल अभ्यास करायचा आहे.

विद्यापीठाच्या बंगळूरु कॅम्पसमध्ये एम.ए. अर्थशास्त्र, एम. ए. विकासशास्त्र (डेव्हलपमेंट) एम. ए. शिक्षणशास्त्र (एज्युकेशन), एम. ए. पूर्व प्राथमिक शिक्षणशास्त्र, एम. एस्सी. हवामान बदल व शाश्वतता; भोपाळ कॅम्पसमध्ये एम. ए. विकासशास्त्र, मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ (एमपीएच); तर रांची कॅम्पसमध्ये एम. ए. उपयोजित अर्थशास्त्र, एम. ए. विकासशास्त्र आदी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेता येणार आहे. 

सर्व कॅम्पसमधील हे पदव्युत्तर अभ्यासक्रम आंतरशाखीय शिक्षण, तज्ज्ञ प्राध्यापकांद्वारे अध्यापन आणि वास्तव जगातील परिस्थितींशी सतत जोडलेले राहण्यावर भर देतात. विद्यार्थी वर्गातील अभ्यासाबरोबर प्रत्यक्ष क्षेत्रीय अनुभव आणि प्रकल्पांच्या माध्यमातून शिक्षण घेतात. तसेच, शैक्षणिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही पार्श्वभूमी असलेल्या प्राध्यापकांबरोबर त्यांना काम करण्याची संधी मिळते. हे अभ्यासक्रम शिक्षण, विकास, अर्थशास्त्र, सार्वजनिक आरोग्य, हवामान बदल आणि संबंधित क्षेत्रांतील करिअरमध्ये रस असलेल्या विविध शाखांमधील पदवीधरांसाठी खुले आहेत. तसेच, ज्यांना पुढील शैक्षणिक अभ्यास आणि संशोधनासाठी भक्कम पाया हवा आहे, त्यांच्यासाठीही हे अभ्यासक्रम उपयुक्त आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
35.4 ° C
35.4 °
35.4 °
25 %
3.3kmh
48 %
Mon
35 °
Tue
42 °
Wed
39 °
Thu
42 °
Fri
43 °

Most Popular

Recent Comments