35.4 C
New Delhi
Tuesday, June 23, 2026
Homeमाहिती तंत्रज्ञानअर्थसंकल्प 2026 परिप्रेक्ष्य कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

अर्थसंकल्प 2026 परिप्रेक्ष्य कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

[अर्थसंकल्पावरील पोस्टर प्रदर्शन व नाविन्यपूर्ण रांगोळी स्पर्धेचे आयोजन]

श्री शिव छत्रपती महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभाग व आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अर्थसंकल्प 2026 परिप्रेक्ष्य’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा सोमवार, 9 फेब्रुवारी 2026 रोजी उत्साहात पार पडली. संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय अॅड. संजय शिवाजीराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ. एम. बी. वाघमारे यांनी दिली.

कार्यशाळेचे उद्घाटन पुणे येथील प्रसिद्ध लेखिका, सहाय्यक प्राध्यापिका व रिता इंडिया फाउंडेशनच्या संचालिका प्रा. डॉ. रिता मदनलाल शेटीया यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम. बी. वाघमारे होते.

डॉ. रिता शेटीया यांनी ‘विकसित भारतासाठी गतिमान, सर्वसमावेशक आणि रोजगारनिर्मितीला चालना देणारा अर्थसंकल्प’ या मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले. पीपीटी सादरीकरणाद्वारे त्यांनी अर्थसंकल्पातील विविध तरतुदींचा आढावा घेत विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली. दरवर्षी जाहीर होणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी तळागाळापर्यंत पोहोचणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी मार्मिक व अभ्यासपूर्ण उत्तरे दिली.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. वाघमारे यांनी भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प असावा, असे प्रतिपादन केले. ग्रामीण व कृषी विकासावर अधिक भर देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यशाळेनिमित्त अर्थसंकल्पावर आधारित पोस्टर प्रदर्शन तसेच नाविन्यपूर्ण रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून राजगुरुनगर येथील रत्नाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पवार, भोसरी येथील प्रीतम प्रकाश महाविद्यालयाचे डॉ. सचिन पवार आणि चाकण येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाचे डॉ. उमेश भोकसे यांनी काम पाहिले. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विजयी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व पारितोषिके प्रदान करण्यात आली.

या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्त्या एचसी. डॉ. सविता शेटीया, अभ्यास मंडळ सदस्य प्रा. डॉ. गोरक्षनाथ सानप, प्रो. डॉ. प्रताप फलफले, डॉ. श्रीकांत फुलसुंदर, डॉ. रमेश काशिदे, वाणिज्य विभागप्रमुख सतीश जाधव, पर्यवेक्षक श्रीमंते आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. सचिन कसबे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. एम. आर. शेलार यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. डॉ. एस. एच. काळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. आर. ए. मोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. पी. बी. सुकाळे, प्रा. जावेद शेख आणि श्री. मितेश गाडेकर यांनी सहकार्य केले.

महाविद्यालयातील प्राध्यापक व मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा उत्साहात पार पडली. अर्थसंकल्पाविषयी जागरूकता निर्माण करत विद्यार्थ्यांना समकालीन आर्थिक घडामोडींचे भान देणारा हा उपक्रम ठरला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
35.4 ° C
35.4 °
35.4 °
25 %
3.3kmh
48 %
Mon
35 °
Tue
42 °
Wed
39 °
Thu
42 °
Fri
43 °

Most Popular

Recent Comments