पुणे- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या नावाने पुण्यात 1000 खाटांच्या मोठ्या रुग्णालयाची निर्मिती होत आहे. या माध्यमातून पुण्यातील नागरिकांसाठी सर्व सोयींनी युक्त अशी वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे. हे रुग्णालय आगामी काळात वैद्यकीय क्षेत्रात ठसा उमटवेल, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी विमान वाहतूक तथा सहकार राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे येथे केले.
भारतीय विमानतळ प्राधिकरण तथा पुणे वैद्यकीय सेवा आणि संशोधन प्रतिष्ठान यांच्या दरम्यान होत असलेल्या सामंजस्य कराराप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी भारतीय विमानतळ प्राधिकरणचे अध्यक्ष विपीन कुमार, महापौर मंजुषा नागपुरे, पुणे वैद्यकीय सेवा आणि संशोधन प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष देशपांडे, सचिव बद्रिनाथ मूर्ति आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्वप्रथम केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्या तर्फे पुणे वैद्यकीय सेवा आणि संशोधन प्रतिष्ठान यांना 12 कोटी 29 लाख 2 हजार 920 रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात मोहोळ यांनी रुग्णालय प्रकल्पाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, “पुणे शहर हे चारही बाजूंनी वाढत आहे. अशा वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या नावाने पुण्यात रुग्णालयाची उभारणी करण्यात येत आहे, ही आनंदाची बाब आहे. या रुग्णालयाच्या निर्मितीमध्ये समाजातील वेगवेगळ्या स्तरातून मदत उभी करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून भारतीय विमानतळ प्राधिकरणच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी फंडातून या रुग्णालयाला सुमारे 12 कोटी 29 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. या कामात आम्हाला खारीचा वाटा उचलण्याची संधी या निमित्ताने मिळत आहे. नागरिकांनी देखील या कामात आपापल्या परीने सहभाग नोंदवावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी केले.
बाळासाहेब देवरस रुग्णालय आगामी काळात वैद्यकीय क्षेत्रात ठसा उमटवेल – केंद्रीय मंत्री मोहोळ
RELATED ARTICLES
New Delhi
overcast clouds
34.1
°
C
34.1
°
34.1
°
51 %
4.2kmh
100 %
Sat
34
°
Sun
37
°
Mon
37
°
Tue
29
°
Wed
36
°


