पुणे, – : नवीन शहरांची रचना करताना पर्यावरणीय आव्हानांचा सामना करण्यासाठी सेप्ट विद्यापीठातील आर्किटेक्चर शाखेत दोन विशेष पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध झाले आहेत. मास्टर्स इन कन्झर्वेशन अँड रीजनरेशन (एमसीआर) आणि मास्टर्स इन लँडस्केप आर्किटेक्चर (एमएलए) अशी या अभ्यासक्रमांची नावे असून त्यामुळे आर्किकेक्ट्ससाठी संधी वाढणार आहेत. या अभ्याभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२६ आहे.
विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, मास्टर्स इन कन्झर्वेशन अँड रीजनरेशन या अभ्यासक्रमात संवर्धन या विषयाला प्रामुख्याने एक मूलगामी डिझाईनची पर्यावरणीय कृती मानण्यात आले आहे. त्यामुळे आजूबाजूच्या विकासविषयक दबावांना एकीकृत करू शकतील अशा ऐतिहासिक संरचनांचे सर्जनशील आणि जबाबदार पुनर्मांडणी करता येईल. इतिहास, तंत्रज्ञान, स्थापत्य आणि शहरी डिझाईन यांच्या
संयोगामध्ये ज्यांना रस आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे.
मास्टर्स इन लँडस्केप आर्किटेक्चर (एमएलए) हा अभ्यासक्रम हवामान बदल आणि पर्यावरणीय परिवर्तनाला प्रतिसाद देणारा आहे.लँडस्केप आर्किटेक्चरमधील एम.आर्च हा अभ्यासक्रम व्यावसायिकांना लँडस्केप, पर्यावरणशास्त्र आणि समाज यांच्या संयोगावर काम करण्यासाठी तयार करणारा आहे. हा अभ्यासक्रम बागकामाच्या पलीकडे जाऊन भारतातील वाढत्या पर्यावरणीय, सामाजिक आणि शहरी आव्हानांना संबोधित करतो. तो लँडस्केपकडे एक गतिमान प्रणाली या दृष्टीने पाहून प्रादेशिक पाणलोट क्षेत्रांपासून ते शहरी सार्वजनिक जागांपर्यंत सर्व पातळींवर डिझाईन करण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देतो. यातील पदवीधर व्यवसाय, शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या ५०० पेक्षा अधिक व्यावसायिकांच्या माजी विद्यार्थ्यांच्या जागतिक नेटवर्कमध्ये सहभागी होतील.
या अभ्यासक्रमांमध्ये वास्तुकला शिक्षणाचे विकसित स्वरूप आणि भारताच्या बांधणी व नैसर्गिक वातावरणाला आकार देण्यासाठी आंतरविद्याशाखीय तज्ञांची वाढती गरज याचे एकत्रितपणे प्रतिबिंब पडले आहे.
सेप्ट विद्यापीठात मध्ये पदव्युत्तर शिक्षण हा केवळ पदवीपूर्व कार्यक्रमाचा विस्तार नसतो. ते जाणीवपूर्वक विशेषीकरणाचे एक स्थान असते. इथे स्टुडिओ हे प्रयोगशाळा म्हणून, वास्तविक जगातील आव्हानांच्या सर्जनशील अन्वेषणासाठी एक जागा म्हणून काम करतात. इथे लहान गट तज्ज्ञ शिक्षकांसोबत युक्तिवाद विकसित करण्यासाठी, प्रोटोटाइपची चाचणी घेण्यासाठी आणि सातत्याने समीक्षा करून भूमिका अधिक सुधारण्यासाठी काम करतात. सेमिस्टर आणि उन्हाळी व हिवाळी स्कूलमध्ये पसरलेले हे अभ्यासक्रम व्यापक बांधणी वातावरणाच्या क्षेत्रातील विस्तृत शोधाची श्रेणी उघडते. विद्यार्थ्यांना कार्यशाळा, सॉफ्टवेअर, ग्रंथालय, अभिलेखागार, साहित्य प्रयोगशाळा आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिकांचे विस्तृत नेटवर्क या स्वरूपातील विस्तृत संसाधने उपलब्ध होतात.


