40.2 C
New Delhi
Monday, June 22, 2026
Homeमाहिती तंत्रज्ञानसेप्ट युनिव्हर्सिटी कडून मास्टर्स इन अर्बन प्लॅनिंग अभ्यासक्रमासाठी अर्ज आमंत्रित

सेप्ट युनिव्हर्सिटी कडून मास्टर्स इन अर्बन प्लॅनिंग अभ्यासक्रमासाठी अर्ज आमंत्रित

अर्ज स्वीकारण्याची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत

पुणे, : सेप्ट युनिव्हर्सिटी च्या नियोजन विद्याशाखेमार्फत उपलब्ध असलेल्या ‘मास्टर इन अर्बन प्लॅनिंग’ (एमयुपी) या दोन वर्षांच्या, पूर्ण-वेळ पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. शहरीकरणाच्या वाढत्या गुंतागुंतीला सामोरे जाण्यासाठी या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली असून यामध्ये शहरी विकास, सार्वजनिक धोरण आणि नियोजनाच्या पद्धती यासाठी चिकित्सकपणे सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांची तयारी होते.अर्ज स्वीकारण्याची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत आहे.

ज्या व्यक्तींना शहरे कशी कार्य करतात हे समजून घेण्याची आणि अधिक समावेशक, शाश्वत व लवचिक शहरी भविष्य घडवण्याची तीव्र इच्छा आहे, त्यांच्या दृष्टीने एमयूपी आहे. वास्तविक शहरी आव्हानांमध्ये सहभागी व्हायचे आहे, सार्वजनिक धोरण आणि विकासाच्या निर्णयांवर प्रभाव टाकायचा आहे आणि विशेषतः भारतीय शहरांच्या संदर्भात सर्वांसाठी अधिक चांगली घडविण्यासाठी ज्यांना अर्थपूर्ण योगदान द्यायचे आहे, अशा व्यक्तींसाठी हा सुयोग्य ठरणारा आहे.

विद्यार्थ्यांना भू-स्थानिक (जिओ-स्पॅटिअल) विश्लेषण, संस्थात्मक आणि धोरणात्मक विश्लेषण, परिदृश्य निर्मिती, नियोजनाची तत्त्वे आणि पद्धती, तसेच प्रभावी व्यावसायिक संवाद कौशल्यांमध्ये भक्कम पाया प्रदान करण्याच्या उद्देशाने सुसज्ज करण्यासाठी मास्टर्स इन अर्बन प्लॅनिंग ((एमयुपी) कार्यक्रमाची रचना केली आहे. स्टुडिओ-आधारित शिक्षण हा या अभ्यासक्रमाचा गाभा आहे. त्याला संकल्पनात्मक, विश्लेषणात्मक आणि पद्धतशीर सखोलता निर्माण करणाऱ्या सैद्धांतिक अभ्यासक्रमांचा आधार लाभला आहे. तसेच आर्थिक साक्षरता, प्रशासकीय चौकट आणि दृकश्राव्य संवाद यांवरही समान भर देण्यात आला आहे.

एमयूपी कार्यक्रमाचे पदवीधर सखोल संस्थात्मक जाणीव आणि व्यावसायिक क्षमता यांचा सामाजिक आणि पर्यावरणीय संवेदनशीलतेसह यांचा मेळ घालणारे नगर नियोजक (अर्बन प्लॅनर्स) म्हणून आपली कारकीर्द घडवतात. खाजगी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील सल्लागार, सरकारी विभाग आणि संस्था, शहर नियोजन आणि शहरी विकास प्राधिकरणे, सार्वजनिक गृहनिर्माण संस्था, अनौपचारिक वस्त्यांसाठी काम करणाऱ्या गैर-सरकारी संस्था, खाजगी स्थावर मालमत्ता संस्था, संशोधन संस्था, शैक्षणिक संस्था आणि थिंक टँक्स यांसारख्या विविध पदांसाठी तरुण व्यावसायिकांची तयारी करून घेण्यावर या अभ्यासक्रमाचा भर आहे.

गेट परीक्षेत वैध गुण असलेले उमेदवार या कार्यक्रमाच्या आवश्यकतेनुसार अर्ज करू शकतात. ज्या अर्जदारांनी ‘गेट २०२६’ परीक्षा दिलेली नाही किंवा ज्यांच्याकडे पात्रतेसाठीचे गुण नाहीत, त्यांच्यासाठी सेप्ट युनिव्हर्सिटी ने एक पर्यायी मार्ग म्हणून सेप्ट पीजी टेस्ट उपलब्ध करून दिली आहे. ही परीक्षा ऑनलाइन घेण्यात येईल आणि दूरस्थपणे देता येईल. त्यामुळे सर्व भौगोलिक ठिकाणांमधील उमेदवारांना ती सहज उपलब्ध होईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
40.2 ° C
40.2 °
40.2 °
17 %
3.2kmh
15 %
Mon
38 °
Tue
42 °
Wed
41 °
Thu
41 °
Fri
43 °

Most Popular

Recent Comments