38 C
New Delhi
Thursday, June 25, 2026
Homeमहाराष्ट्र१४ व्या न्या. पी. एन. भगवती आंतरराष्ट्रीय मानवाधिकार मूट कोर्ट स्पर्धेचे उद्घाटन

१४ व्या न्या. पी. एन. भगवती आंतरराष्ट्रीय मानवाधिकार मूट कोर्ट स्पर्धेचे उद्घाटन

पुणे: भारती विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ) च्या न्यू लॉ कॉलेज, एरंडवणे,पुणे आयोजित १४ व्या न्या. पी. एन. भगवती आंतरराष्ट्रीय मानवाधिकार मूट कोर्ट स्पर्धा -२०२६ चे उद्घाटन उत्साहात झाले. या उद्घाटन समारंभास न्या. उमेश डी. साळवी (माजी न्यायाधीश, बॉम्बे उच्च न्यायालय तसेच माजी अध्यक्ष, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, नवी दिल्ली), प्रा. डॉ. विवेक सावजी (कुलगुरू, भारती विद्यापीठ – अभिमत विद्यापीठ), जी. जयकुमार (कुलसचिव भारती विद्यापीठ – अभिमत विद्यापीठ,पुणे) तसेच डॉ. शशिकांत सी. हजारे (प्राचार्य, न्यू लॉ कॉलेज, पुणे) यांची उपस्थिती होती.

देशातील विविध नामांकित विधी महाविद्यालयांमधून सहभागी झालेल्या ३८ उत्कृष्ट संघांच्या सहभागामुळे स्पर्धेची गुणवत्ता व प्रतिष्ठा अधिक वृद्धिंगत झाली. तसेच केनिया व नेपाळ येथील आंतरराष्ट्रीय संघांच्या सहभागामुळे स्पर्धेला खऱ्या अर्थाने जागतिक स्वरूप प्राप्त झाले आहे.

प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात न्यायव्यवस्थेतील वैयक्तिक अनुभवांचा संदर्भ देत विद्यार्थी सहभागींचे मार्गदर्शन केले. मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी सत्यनिष्ठा, प्रामाणिकपणा व न्यायाच्या मार्गाचे महत्त्व अधोरेखित केले.

ही स्पर्धा विधी शिक्षणातील उत्कृष्ठता, संशोधन कौशल्ये व वक्तृत्व कलेचा विकास साधण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरत आहे, असे संयोजकांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
38 ° C
38 °
38 °
30 %
5kmh
1 %
Thu
38 °
Fri
43 °
Sat
45 °
Sun
44 °
Mon
43 °

Most Popular

Recent Comments