36.1 C
New Delhi
Wednesday, May 20, 2026
HomeTop Five Newsश्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात रामजन्मोत्सव उत्साहात साजरा

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात रामजन्मोत्सव उत्साहात साजरा

कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके.

पंढरपूर – रामनवमी प्रतिवर्षीप्रमाणे श्री विठ्ठल सभामंडपामध्ये श्री रामनवमी जन्मोत्सव सकाळी 10.00 ते 12.00 या वेळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री विठ्ठलास सकाळी 11.00 महानैवेद्य नंतर पांढरा पोशाख, पागोटे व साखरेचा हार परिधान करून श्रींच्या अंगावर गुलाल टाकून दुपारी 12.00 वाजता राम जन्मोत्सव सोहळा पार पडल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

श्री विठ्ठल सभा मंडपामध्ये श्रीराम जन्माचे श्री. विठ्ठल महाराज देहूकर फड (बिद्रीकर मंडळी) ह.भ.प.श्री. श्रीकांत महाराज पातकर, पंढरपूर यांचे श्री. रामनवमी जन्मोत्सवाचे कीर्तन संपन्न झाले किर्तन झाल्यानंतर उपस्थित भाविकांना प्रसाद म्हणून सुंठवडा वाटप करण्यात आला. यावेळी मंदिर समितीच्या सन्माननीय सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे, सदस्य श्री संभाजी शिंदे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्र. व्यवस्थापक संदेश भोसले, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, विभाग प्रमुख संजय कोकीळ , सहाय्यक विभाग प्रमुख संदीप कुलकर्णी प्रसाद दशपुत्रे व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
याशिवाय, रामनवमी जन्मोत्सवा निमित्त श्री संत तुकाराम भवन येथील अन्नछत्राच्या भोजनप्रसादामध्ये गोड पदार्थाचा समावेश करण्यात आला होता, सुमारे 2000 भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतल्याचे प्र. व्यवस्थापक संदेश भोसले यांनी यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
36.1 ° C
36.1 °
36.1 °
23 %
2.1kmh
0 %
Tue
38 °
Wed
45 °
Thu
45 °
Fri
44 °
Sat
45 °

Most Popular

Recent Comments