40.1 C
New Delhi
Monday, May 25, 2026
HomeTop Five Newsदेशाच्या ऊर्जा सुरक्षेला बळ!

देशाच्या ऊर्जा सुरक्षेला बळ!

१५ हजार टन एलपीजी घेऊन ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

Gas Cylinder | मुंबई : पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरात ऊर्जा संकट निर्माण झाले असताना भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. १५,४०० टन द्रवरूप पेट्रोलियम वायू (एलपीजी) घेऊन ‘ग्रीन आशा’ हे भारतीय जहाज यशस्वीरित्या नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण येथे दाखल झाले. या यशस्वी मोहिमेमुळे Gas Cylinder देशातील घरगुती गॅस पुरवठ्याला मोठी बळकटी मिळाली आहे.

पश्चिम आशियातील अत्यंत संवेदनशील समजली जाणारी होर्मुझची सामुद्रधुनी पार करून या जहाजाने भारतात सुरक्षितपणे प्रवेश केला. जेएनपीए प्रशासनाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, ‘ग्रीन आशा’ हे भारतीय ध्वज असलेले जहाज युद्धाच्या छायेतून मार्गक्रमण करत सुरक्षितपणे मायदेशी पोहोचले.

होर्मुझची सामुद्रधुनी हा जागतिक ऊर्जा पुरवठ्यातील अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग मानला जातो. युद्धजन्य परिस्थितीत या मार्गावरून होणारी वाहतूक धोकादायक ठरते. अशा परिस्थितीत भारतीय जहाजाने केलेला हा प्रवास देशाच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.Gas Cylinder

या मोहिमेत भारतीय नौदल आणि केंद्र सरकारच्या प्रभावी मुत्सद्दी धोरणांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. त्यांच्या देखरेखीखाली जहाजाने सुरक्षितपणे भारतात पोहोचून राष्ट्रीय ऊर्जा पुरवठा साखळी मजबूत असल्याचे सिद्ध केले.

जहाजावरील १५,४०० टन एलपीजीचा साठा, मालवाहू यंत्रणा आणि सर्व कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या पुरवठ्यामुळे देशातील घरगुती गॅस वितरणात स्थैर्य राहण्यास मदत होणार आहे.

न्हावा शेवा म्हणून ओळखले जाणारे जवाहरलाल नेहरू बंदर हे देशातील कंटेनर आणि द्रवरूप मालवाहतुकीचे प्रमुख केंद्र आहे. पश्चिम आशियातील भू-राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर ‘ग्रीन आशा’चे सुरक्षित आगमन हे भारताच्या सक्षम ऊर्जा व्यवस्थापनाचे आणि रणनीतिक तयारीचे प्रतीक मानले जात आहे . Greeen zone

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
40.1 ° C
40.1 °
40.1 °
22 %
3.6kmh
40 %
Mon
42 °
Tue
45 °
Wed
46 °
Thu
47 °
Fri
45 °

Most Popular

Recent Comments