38.1 C
New Delhi
Tuesday, May 26, 2026
Homeमहाराष्ट्रपिंपरी-चिंचवडकरांना प्रदूषण मुक्त पाणी पुरवण्यास ‘‘फस्ट प्रायोरिटी’’

पिंपरी-चिंचवडकरांना प्रदूषण मुक्त पाणी पुरवण्यास ‘‘फस्ट प्रायोरिटी’’

निघोजे बंधाऱ्याच्या पाहणीसाठी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा दौरा

– भाजपा आमदार महेश लांडगे यांनी सूचवल्या विविध उपाययोजना

पिंपरी-चिंचवड-

पिंपरी-चिंचवड शहराच्या जीवनवाहिन्या ठरलेल्या पवना आणि इंद्रायणी नद्यांतील वाढत्या प्रदूषणामुळे शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तात्काळ आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी शहराचा दौरा केला. तसेच, इंद्रायणी नदीवरील निघोजे बंधाऱ्याची प्रत्यक्ष पाहणी केली.

पवना आणि इंद्रायणी नद्यांमध्ये शहरी व औद्योगिक सांडपाणी थेट मिसळत असल्याने पाणी अत्यंत दूषित झाले आहे. या पाण्यात आरोग्यास घातक घटक आढळत असून भविष्यात कॅन्सरसारख्या आजारांचा धोका वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवडमधील सुमारे ३५ लाख नागरिकांचे जीवन या नद्यांवर अवलंबून आहे. या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांनी विधानसभा अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडली होती. त्यावेळी रावेत आणि निघोजे या बंधाऱ्यांची पाहणी करुन ठोस उपाययोजना करण्याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी केली जाईल, असे आश्वासन पंकजा मुंडे यांनी दिले होते.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील नियोजित दौऱ्यानुसार, पंकजा मुंडे यांनी निघोजे येथील बंधाऱ्याला भेट दिली. यावेळी महापौर रवि लांडगे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेता भाऊसाहेब भोईर, महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त अभिजीत चौधरी, मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे यांच्यासह महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, एमआयडीसी आणि पर्यावरण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


**
तात्काळ अपेक्षीत उपाययोजना…
महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांमध्ये पवना नदीवर STP प्रकल्प तातडीने उभारणे. किवळे येथील २० एमएलडी STP प्रकल्पासाठी प्रलंबित GR त्वरित जारी करणे. रावेत व निघोजे बंधाऱ्यांवर अत्याधुनिक एरेटर बसवणे. प्रदूषण होणाऱ्या ‘हॉटस्पॉट’ ठिकाणी वर्षभरात STP सुरू करणे आणि त्यासाठी PMRDA मार्फत जलपर्णी काढण्याची स्वतंत्र निविदा प्रसिद्ध करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
***
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक व्हावी…
पवना व इंद्रायणी नदीतून थेट पाणीपुरवठा बंद करून स्वतंत्र पाइपलाइन योजना राबवणे. निगडी व चिखली जलशुद्धीकरण केंद्रांवर टर्शरी ट्रीटमेंट व ओझोनेशन युनिट बसवणे. नदी सुधार प्रकल्पांत अधिक STP समाविष्ट करणे. जैवविविधता उद्याने, वृक्षारोपण आणि पर्यावरणपूरक विकासावर भर द्यावा. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच, NRCD कडून प्रकल्पांना तात्काळ मंजुरी मिळावी. या करिता केंद्र सरकारकडे पाठपुरावा वाढवणे. सर्व प्रलंबित प्रकल्पांना गती द्यावी, अशी मागणी आमदार लांडगे यांनी दिली.
***
प्रतिक्रिया :

पिंपरी-चिंचवडमधील सुमारे ४० लाख नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने रावेत आणि निघोजे बंधाऱ्यातील पाण्याच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. याबाबत तात्काळ आणि दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात. यासाठी महापालिका, पीएमआरडीए आणि राज्य शासनाकडे आम्ही सातत्त्याने पाठपुरावा करीत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात दोन्ही नद्यांचा सुधार प्रकल्प आणि शुद्ध पाणी पुरवठा याबाबत कालबद्ध कार्यक्रम हाती घेणार आहोत. पुणे महानगर क्षेत्रातील सर्वच नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी राज्य सरकार निश्चितपणे सकारात्मक निर्णय घेत आहे.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
38.1 ° C
38.1 °
38.1 °
22 %
4.6kmh
40 %
Mon
40 °
Tue
45 °
Wed
46 °
Thu
47 °
Fri
45 °

Most Popular

Recent Comments