35.4 C
New Delhi
Tuesday, June 23, 2026
HomeTop Five Newsनाशिक फाटा-खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी प्रशासनाला सूचना

नाशिक फाटा-खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरसाठी प्रशासनाला सूचना

शेतकरी व नागरिकांच्या हिताला प्राधान्य देणार : आ. महेश लांडगे

पिंपरी-चिंचवड-

नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्प हा पिंपरी-चिंचवडच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा आधार ठरणार असून, विकासकामांसोबतच शेतकरी व नागरिकांच्या हितालाही प्राधान्य द्यावे, अशा सूचना भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

या प्रकल्पासंदर्भात महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत नगर रचना विभाग आणि भू संपादन विभागाची संयुक्त बैठक घेण्यात आली. बैठकीत रॅम्प नियोजन, भूसंपादन प्रक्रिया आणि नागरिकांच्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

आमदार लांडगे यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना देताना भोसरी, मोशी आणि बोऱ्हाडेवाडी येथे रॅम्पसाठी शेतकऱ्यांची नव्याने जमीन संपादित न करता प्राधिकरणाच्या उपलब्ध जागेचा वापर करावा, असे सांगितले. तसेच इंद्रायणी नदी परिसरातील रॅम्प हा सोसायटीलगत न करता नदीपलीकडे नियोजित करण्याचे निर्देश दिले.

ई प्रभाग कार्यालयाजवळील दोन्ही रॅम्प साईनाथ हॉस्पिटल परिसरात एका बाजूस करण्यात यावेत, जेणेकरून नागरिकांना चौक ओलांडण्याची गरज भासणार नाही आणि वाहतूक अधिक सुरक्षित व सुलभ होईल, अशी सूचना त्यांनी केली. प्रदर्शन केंद्राजवळ स्वतंत्र रॅम्प उतरवण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला.

भूसंपादन प्रक्रियेदरम्यान सुनावणीसाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे समाधान होईल, याची प्रशासनाने विशेष काळजी घ्यावी, असे निर्देशही आमदार लांडगे यांनी दिले. भोसरी गावठाणातील ४५ मीटर गावठाण हद्द वगळून ६१ मीटर रुंदीकरणाचे रेखांकन नागरिकांना स्पष्टपणे समजावून सांगण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या.

संपूर्ण भूसंपादन प्रक्रिया गतीने आणि पारदर्शकपणे पूर्ण करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. या प्रकल्पामुळे भविष्यातील वाहतूक कोंडी कमी होऊन परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
**

“नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड कॉरिडॉर हा केवळ विकासाचा प्रकल्प नाही, तर पिंपरी-चिंचवडच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेचा मजबूत पाया आहे. हा प्रकल्प राबवताना शेतकरी, स्थानिक नागरिक आणि परिसराच्या हिताला कुठेही धक्का लागणार नाही, याची आम्ही पूर्ण काळजी घेत आहोत. भूसंपादन प्रक्रियेत प्रत्येक नागरिकाला न्याय मिळेल, पारदर्शकता राखली जाईल आणि विकासासोबत लोकांचा विश्वासही अबाधित ठेवला जावा, अशी सूचना प्रशासनाला केली आहे.
महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
35.4 ° C
35.4 °
35.4 °
25 %
3.3kmh
48 %
Mon
35 °
Tue
42 °
Wed
39 °
Thu
42 °
Fri
43 °

Most Popular

Recent Comments