42.1 C
New Delhi
Tuesday, May 19, 2026
Homeमाहिती तंत्रज्ञानबीएसएच ने आपल्या बॉश टॉप लोड वाशिंग मशीनच्या वाढीला गती देण्यासाठी नवीन...

बीएसएच ने आपल्या बॉश टॉप लोड वाशिंग मशीनच्या वाढीला गती देण्यासाठी नवीन श्रेणी केली लाँच

पुणे, : होम अप्लायन्सेस उद्योगातील जागतिक आघाडीची कंपनी बीएसएच हाऊसगेरेट जीएमबीएच ची उपकंपनी असलेल्या बीएसएच होम अप्लायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड’ने आपल्या टॉप लोड वाशिंग मशीन विभागातील वाढीला गती देण्यासाठी नवीन श्रेणी लाँच केली आहे. कंपनीने ७ किलो ते १२ किलो क्षमतेच्या बॉश टॉप लोड वाशिंग मशीन वॉशिंग मशीन्ससह आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे.

हा लॉन्च भारतातील सर्वात मोठ्या आणि वेगाने वाढणाऱ्या लॉन्ड्री विभागांपैकी एक असलेल्या टॉप लोड वॉशिंग मशीन सेगमेंटमध्ये बॉशच्या धोरणात्मक विस्ताराचे प्रतीक आहे. किफायतशीर ते प्रीमियम किंमत श्रेणीपर्यंत पसरलेल्या नव्या ऑटोमॅटिक टॉप लोड पोर्टफोलिओद्वारे, बॉश चे उद्दिष्ट या श्रेणीचा स्वीकार अधिक वेगाने वाढवणे तसेच उच्च-वॉल्यूम टॉप लोड वाशिंग मशीन बाजारातील आपली उपस्थिती अधिक मजबूत करणे आहे.

उद्योग अहवालांनुसार, सोयीसुविधा, प्रीमियम अनुभव आणि स्मार्ट फीचर्सकडे वाढता कल टॉप लोड वाशिंग मशीनच्या स्वीकाराला वेग देत आहे. अधिक सक्षम पोर्टफोलिओ, प्रगत तंत्रज्ञान आणि विविध किंमत श्रेणींमध्ये वाढलेली उपलब्धता यांच्या जोरावर, बीएसएच भारतातील टॉप लोड वाशिंग मशीन सेगमेंटमधील पुढील वाढीच्या टप्प्यावर आक्रमकपणे भक्कम पकड निर्माण करण्यासाठी सज्ज आहे.

भारतामधील बीएसएचच्या लॉन्ड्री व्यवसायाला मिळत असलेल्या मजबूत गतीच्या पार्श्वभूमीवर हा विस्तार करण्यात आला आहे. २०२६ च्या पहिल्या तिमाहीत, बॉश ने ऑटोमॅटिक टॉप लोड विभागात मागील वर्षाच्या तुलनेत दमदार दुहेरी अंकातील वाढ नोंदवली. याचबरोबर, सर्व विक्री चॅनेल्समधून मिळालेल्या मजबूत प्रतिसादामुळे एकूण लॉन्ड्री व्यवसायातही तब्बल ५० टक्क्यांची उल्लेखनीय वाढ नोंदवण्यात आली.

लाँचच्या निमित्ताने बोलताना बीएसएच होम अप्लायन्सेसचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, सैफ खान म्हणाले, “भारतातील लाँड्री श्रेणी वेगाने विकसित होत आहे आणि बीएसएच होम अप्लायन्सेस एक भक्कम आणि अधिक संतुलित पोर्टफोलिओसह या बदलाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे. आमच्या टॉप लोड श्रेणीच्या विस्तारासह, आम्ही प्रीमियम बॉश तंत्रज्ञान विविध किंमतींच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करून देत आहोत. याद्वारे आम्ही वेगाने वाढणाऱ्या टायर 2 आणि टायर 3 शहरांमधील ग्राहकांपर्यंत पोहोचत आहोत, जिथे सेमी-ऑटोमॅटिककडून फुली ऑटोमॅटिक मशीन्सकडे वळण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे.”

ते पुढे म्हणाले, “आमच्या ‘मेक इन इंडिया, फॉर इंडिया या दृष्टिकोनावर आधारित ही श्रेणी आधुनिक भारतीय कुटुंबांसाठी तयार करण्यात आली आहे — जी बुद्धिमान, शक्तिशाली आणि उत्कृष्ट कामगिरी बजावणारी आहे. आमचे ध्येय स्पष्ट आहे: आमचे टॉप लोड वाशिंग मशीन व्हॉल्यूम तिप्पट करणे, आमचा मार्केट शेअर दुप्पट करणे आणि या श्रेणीमध्ये अव्वल स्थान मिळवणे.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
42.1 ° C
42.1 °
42.1 °
12 %
5.1kmh
0 %
Tue
45 °
Wed
45 °
Thu
44 °
Fri
44 °
Sat
45 °

Most Popular

Recent Comments