38.6 C
New Delhi
Sunday, June 28, 2026
HomeTop Five Newsबारामतीत प्रशिक्षण विमान कोसळलं

बारामतीत प्रशिक्षण विमान कोसळलं

गोजुबावी परिसरात खळबळ, वैमानिक बचावला

पुणे : बारामती तालुक्यातील गोजुबावी गावाच्या हद्दीत प्रशिक्षणासाठी वापरले जाणारे एक छोटे विमान कोसळल्याची घटना घडली असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रेडबर्ड कंपनीचे हे प्रशिक्षण विमान उड्डाणादरम्यान दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात वैमानिक सुरक्षित बचावल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित विमान प्रशिक्षणासाठी उड्डाण करत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, विमान नेमके कोणत्या कारणामुळे कोसळले याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

विमान कोसळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिस आणि संबंधित यंत्रणांनीही घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. दुर्घटनाग्रस्त विमान शेतजमिनीत पडल्याने मोठी जीवितहानी टळल्याचे सांगितले जात आहे.

या घटनेनंतर काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विमान कोसळल्याचा मोठा आवाज झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. पोलिसांनी तत्काळ परिसराचा ताबा घेतला असून, सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांना घटनास्थळापासून दूर ठेवण्यात आले.

विशेष म्हणजे, याच गोजुबावी परिसरात यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानालाही अपघात झाला होता. त्यामुळे पुन्हा त्याच भागात विमान दुर्घटना घडल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, या अपघातामागील नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला असून, तांत्रिक बिघाडाची शक्यता गृहीत धरून संबंधित यंत्रणा चौकशी करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
38.6 ° C
38.6 °
38.6 °
27 %
1.5kmh
42 %
Sat
39 °
Sun
44 °
Mon
45 °
Tue
43 °
Wed
42 °

Most Popular

Recent Comments