40.2 C
New Delhi
Monday, June 22, 2026
Homeमाहिती तंत्रज्ञानअपग्रॅड स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी आणि एडीवायपीयू यांच्‍याकडून इंडस्ट्री-इंटिग्रेटेड बी.टेक प्रोग्राम लाँच

अपग्रॅड स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी आणि एडीवायपीयू यांच्‍याकडून इंडस्ट्री-इंटिग्रेटेड बी.टेक प्रोग्राम लाँच

४ वर्षांचा रेसिडेन्शियल (निवासी) प्रोग्राममध्‍ये यूजीसी-मान्यताप्राप्त पदवीसह इंडस्ट्री-इंटिग्रेटेड एआय इंजिनिअरिंग शिक्षणाचे संयोजन

पुणे, – : अपग्रॅड स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी (यूजीएसओटी) आणि अजिंक्य डीवाय पाटील युनिव्हर्सिटी (एडीवायपीयू) यांनी आज चार वर्षांचा निवासी बी.टेक इन कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) प्रोग्राम लाँच करण्यासाठी धोरणात्मक सहयोगाची घोषणा केली. विद्यार्थ्यांना सुरुवातीपासून उद्योग-संबंधित एआय इंजिनिअरिंग कौशल्यांसह यूजीसी मान्यताप्राप्त पदवी प्रदान करण्यासाठी हा प्रोग्राम डिझाइन करण्‍यात आला आहे. पारंपारिक इंजिनिअरिंग शिक्षण आणि एआय-चालित कार्यक्षेत्रातील झपाट्याने बदलणाऱ्या गरजा यांमधील वाढती तफावत दूर करणे या प्रोग्रामचा मुख्य उद्देश आहे. या प्रोग्रामची पहिली बॅच ऑगस्ट-सप्टेंबर २०२६ मध्ये सुरू होणार आहे.

कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून (सीबीएसई, आयसीएसई किंवा राज्य मंडळे) भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) विषयांमध्ये किमान ५० टक्‍के गुणांसह इयत्ता १२ वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या प्रवेशासाठी पात्र आहेत.

या सहयोगांतर्गत, अजिंक्य डीवाय पाटील युनिव्हर्सिटी कॅम्पस पायाभूत सुविधा, निवासी शिक्षण वातावरण प्रदान करेल आणि यूजीसी-मान्यताप्राप्त बी.टेक पदवी बहाल करेल. यूजीएसओटी एडीवायपीयूसोबत सहयोगाने इंडस्ट्री-इंटिग्रेटेड (उद्योगाभिमुख) शिक्षण अनुभव देण्यास मदत करेल. यामध्ये जगातील आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या अभियंत्यांकडून लाईव्ह मार्गदर्शन, दर सहा महिन्यांनी अद्ययावत होणारा एआय-फर्स्ट अभ्यासक्रम, पहिल्या सेमिस्टरपासून प्रत्यक्ष कोडिंग व प्रॉडक्ट-बिल्डिंग स्प्रिंट्स, आणि उद्योग क्षेत्रातील संस्थापक, सीएक्सओ व आघाडीच्या प्रमुखांसोबत नियमित संवाद यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश असेल.

विद्यार्थी तीन भविष्य-केंद्रित विशेष शाखांमधून निवड करू शकतात:

· फुल स्टॅक एआय आणि क्लाउड इनोव्हेशन– यामध्ये एंड-टू-एंड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, एआय अॅप्लिकेशन्स आणि क्लाउड-नेटिव्ह तंत्रज्ञानाचा समावेश आहे.

· एआय आणि क्वांटम कम्प्युटिंग– यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि उदयास येणाऱ्या क्वांटम कम्प्युटिंगच्या संकल्पना व उपयोजनांचे संयोजन आहे.

· एआय आणि जेनएआय इंजिनिअरिंग– हे प्रामुख्याने जनरेटिव्ह एआय, लार्ज लँग्वेज मॉडेल्स आणि नेक्स्‍ट-जनरेशन एआय प्रॉडक्ट डेव्हलपमेंटवर केंद्रित आहे.

टेक्निकल प्रशिक्षणाव्यतिरिक्त या प्रोग्राममध्ये सात सेमिस्टरचा स्टार्टअप ट्रॅक समाविष्ट करण्यात आला आहे, जो विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या कौशल्यांसोबत उद्योजकता, नेतृत्व आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्यास सक्षम करतो.
या प्रोग्राममधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अपग्रॅडच्या करिअर सपोर्ट परिसंस्‍थेचा फायदा मिळेल, ज्यामध्ये ३००० पेक्षा जास्त हायरिंग पार्टनर्स आहेत. तसेच या प्लेसमेंट नेटवर्कने आर्थिक वर्ष २०२३ ते आर्थिक वर्ष २०२५ दरम्यान १,१०,००० हून अधिक प्लेसमेंट्स मिळवून दिल्या आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा रोजगार आणि करिअरच्या वाढीचा मार्ग अधिक प्रबळ झाला आहे.

या सहयोगाबाबत मत व्‍यक्त करत अजिंक्य डीवाय पाटील ग्रुपचे चेअरमन आणि अजिंक्य डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीचे चान्सलर डॉ. अजिंक्य डीवाय पाटील म्हणाले, “अजिंक्य डीवाय पाटील ग्रुपमध्ये आमचा नेहमी विश्वास राहिला आहे की, शिक्षण हे भविष्यानुसार बदलले पाहिजे. हा सहयोग शैक्षणिक विश्वासार्हता आणि उद्योग क्षेत्रातील उपयुक्तता यांना एकाच व्यासपीठावर आणतो, ज्यामुळे विद्यार्थी मान्यताप्राप्त पदवी मि‍ळवण्‍यासह वेगाने बदलणाऱ्या जगात प्रगती करण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्येही आत्मसात करतील.”

अपग्रॅड स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीचे सीईओ विश्वा मोहन म्हणाले, “भारतात इंजिनिअरिंगच्या गुणवत्तेची कधीच कमतरता नव्हती, कमतरता होती ती उद्योग क्षेत्राला प्रत्यक्षात काय पाहिजे याच्याशी सुसंगत असणाऱ्या इंजिनिअरिंग शिक्षणाची. ही तफावत दूर करण्‍यासाठी अजिंक्य डीवाय पाटील युनिव्हर्सिटीसोबत हा सहयोग करण्‍यात आला आहे: एक खरी पदवी, एक खरा कॅम्पस आणि खरी कौशल्ये ज्यांच्या जोरावर कंपन्या पहिल्या दिवसापासून नोकरी देतात. आम्ही ज्या युनिव्हर्सिटींसोबत काम करत आहोत, तिथे हेच मॉडेल आणत आहोत.”

भारतात दरवर्षी जवळपास १.५ दशलक्ष इंजिनिअरिंग पदवीधर तयार होतात, तरीही रोजगाराची मोठी तफावत या क्षेत्रासमोर आव्हान म्हणून उभी आहे. इंजिनिअरिंग हा अजूनही देशातील सर्वात लोकप्रिय करिअर मार्गांपैकी एक असला तरी अनेक पदवीधरांकडे एआय, क्लाउड कम्प्युटिंग आणि प्रगत सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांसाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्यांचा अभाव दिसून येतो. भविष्यासाठी सज्ज असलेल्या मनुष्यबळाची मागणी झपाट्याने वाढत असताना अपग्रॅड स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी आणि अजिंक्य डीवाय पाटील युनिव्हर्सिटी यांच्‍यामधील या सहयोगाचा अशा इंडस्ट्री-इंटिग्रेटेड आणि एआय-फर्स्ट इंजिनिअरिंग शिक्षण मॉडेलच्या माध्यमातून ही तफावत दूर करण्‍याचा मनसुबा आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
40.2 ° C
40.2 °
40.2 °
17 %
3.2kmh
15 %
Mon
38 °
Tue
42 °
Wed
41 °
Thu
41 °
Fri
43 °

Most Popular

Recent Comments