42.5 C
New Delhi
Tuesday, June 30, 2026
HomeTop Five Newsमहसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या आदेश पूर्णतः रद्द करा : रोहन सुरवसे पाटील

महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या आदेश पूर्णतः रद्द करा : रोहन सुरवसे पाटील

बदली आदेशाला स्थगिती नको तर रद्द करा

पुणे : विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण (एसएसआर) आणि आगामी जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कामाशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या टाळण्याचे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने दिले असतानाही पुणे जिल्ह्यात तलाठी, महसूल सहायक, अव्वल कारकून, सर्कल यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सदर बाबत जिल्हाधिकारी यांनी सदर बदली आदेश बाबत स्थगिती दिली असून त्या बदल्या आदेश तातडीने रद्द करून राज्य सरकारच्या धोरणानुसार पारदर्शक ऑनलाइन बदली प्रक्रिया पुढील काळात राबविण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि निवडणूक आयोगाकडे सुद्धा केली आहे.

निवडणूक आयोगाने विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण आणि जनगणना तयारीच्या काळात निवडणूक कामाशी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या टाळण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, पुणे जिल्ह्यात झालेल्या तलाठी, मंडळ अधिकारी , महसूल सहायक, अव्वल कारकून,( वर्ग -३) यांच्या
बदल्या निवडणूकविषयक कामकाज पूर्ण होईपर्यंत स्थगित ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहेत. मात्र ह्या बदल्या होताना पारदर्शक पद्धतीला हरताळ फासला गेल्याचे मत सुरवसे यांनी व्यक्त केले यातील अनेक बदल्या करताना नियमांना बगल देण्यात आलेली असून
केवळ स्थगिती न देता संबंधित बदली आदेश पूर्णपणे रद्द करण्यात यावेत, अशी मागणी सुरवसे पाटील यांनी केली आहे.

सुरवसे पाटील यांनी दिलेल्या निवेदनानुसार, सध्या राज्यभर विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसएसआर) मोहीम सुरू असून महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी आणि इतर कर्मचारी या प्रक्रियेत कार्यरत आहेत. त्याचबरोबर जनगणनेची तयारीही सुरू असल्याने अशा कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती दिली असली तरी चुकीच्या पद्धतीने झालेल्या बदल्या पूर्णतः रद्द करण्याचे आदेश करावेत तसेच पुढील काळात ज्यावेळी बदल्या कराव्या लागतील त्या वेळी ऑनलाइन पद्धतीचे सर्व निकष व नियम पाळले जावेत

याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल शाखेनेही तलाठी, महसूल सहाय्यक, मंडळ अधिकारी आणि सहाय्यक महसूल अधिकारी यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्या पुढील आदेश येईपर्यंत कोणालाही कार्यमुक्त करण्यात येऊ नये, असे परिपत्रक जारी केले होते. मात्र, त्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बदल्यांचे आदेश काढल्याने प्रशासनाची भूमिका परस्परविरोधी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर झालेल्या बदल्यांमुळे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण आणि जनगणना प्रक्रियेवर परिणाम होण्याबरोबरच महसूल प्रशासनात गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सुरवसे पाटील यांनी म्हटले आहे. सदर बदली आदेशाला स्थगिती दिली आहे मात्र चुकीच्या पद्धतीने झालेल्या बदल्या आदेश रद्द करावेत आणि पुढील काळात राज्य शासनाच्या धोरणानुसार ऑनलाइन, पारदर्शक व गुणवत्ताधारित बदली प्रक्रिया राबवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या नियम डाउनलुन बदल्या करण्यात आले आहेत त्या रद्द कराव्यात अशी आमची मागणी आहे. रद्द न झाल्यास येणाऱ्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल.

  • रोहन सुरवसे पाटील, नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
42.5 ° C
42.5 °
42.5 °
21 %
5kmh
99 %
Tue
43 °
Wed
41 °
Thu
35 °
Fri
33 °
Sat
40 °

Most Popular

Recent Comments