42.5 C
New Delhi
Tuesday, June 30, 2026
HomeTop Five Newsविठुरायाच्या तुळशी अर्चन पूजेची ऑनलाईन नोंदणी ३० जूनपासून

विठुरायाच्या तुळशी अर्चन पूजेची ऑनलाईन नोंदणी ३० जूनपासून

१ ते ९ जुलैच्या पूजांसाठी संधी

भाविकांना मंदिर समितीचे आवाहन; अधिकृत संकेतस्थळावरून घरबसल्या नोंदणीची सुविधा

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या तुळशी अर्चन पूजेसाठी मंदिर समितीकडून १ ते ९ जुलै २०२६ या कालावधीतील ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया ३० जून रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

मंदिर समितीकडून भाविकांसाठी नियमितपणे तुळशी अर्चन पूजेची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. या पूजेसाठी २,१०० रुपये इतके देणगी मूल्य निश्चित करण्यात आले आहे. गर्दीचे तसेच प्रमुख सण-उत्सवाचे दिवस वगळून या कालावधीत भाविकांना पूजेची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

भाविकांनी मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाईन नोंदणी करताना कोणतीही अडचण आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयात आवश्यक मार्गदर्शन व नोंदणीसाठी मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

पूजेसंदर्भातील अटी, शर्ती व इतर माहिती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी ०२१८६-२९९२९९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी केले आहे.


तुळशी अर्चन पूजेची माहिती

  • नोंदणी सुरू : ३० जून २०२६, सकाळी ११ वाजल्यापासून
  • पूजेचा कालावधी : १ ते ९ जुलै २०२६
  • पूजा देणगी : ₹२,१००
  • नोंदणी माध्यम : मंदिर समितीचे अधिकृत संकेतस्थळ
  • ऑफलाइन मदत : नित्योपचार कार्यालयात उपलब्ध
  • संपर्क : ०२१८६-२९९२९९
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
42.5 ° C
42.5 °
42.5 °
21 %
5kmh
99 %
Tue
43 °
Wed
41 °
Thu
35 °
Fri
33 °
Sat
40 °

Most Popular

Recent Comments