पुणे, – : आरआर काबेल फाउंडेशनचा सीएसआर उपक्रम रोशनीने एलिक्सिर फाउंडेशनच्या सहयोगाने “वाहतूक जागरूकता, व्यवस्थापन आणि रस्ता सुरक्षा मोहीम” यशस्वीरित्या पूर्ण केल्याची घोषणा केली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यांतील रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता वाढवणे हा होता.
वर्दळीचे जंक्शन, अपघात प्रवण क्षेत्र, शाळा आणि रुग्णालये यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी हे बूथ उभारल्यास चालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याची सतत आठवण करून देतात. यामुळे अतिवेग, मद्यपान करून गाडी चालवणे आणि इतर असुरक्षित पद्धतींना आळा बसतो. हे बूथ अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांना त्वरित मदत पोहोचवण्यास सक्षम करतात, ज्यामुळे जीव वाचवण्यास मदत होते. याशिवाय, प्रवासादरम्यान व्यक्तींना मदत किंवा मार्गदर्शनाची गरज भासल्यास हे पोलिस बूथ सहाय्य केंद्र म्हणून काम करतात. रस्ता सुरक्षा वाढवून, अपघात रोखून आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करून पोलिस बूथ केवळ कायदा अंमलबजावणी साध्य करण्यासह समाजाला महत्त्वपूर्ण फायदेही पोहोचवतात.
आरआर ग्लोबलच्या संचालिका श्रीमती कीर्ती काब्रा म्हणाल्या की”आरआर काबेलमध्ये आमचे रस्ता सुरक्षा हे नागरी कर्तव्य आहे, तसेच आम्ही रस्ता सुरक्षिततेला सामूहिक ध्येय मानतो. एलिक्सिर फाउंडेशनसोबत सहयोगाने राबवलेल्या या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही व्यक्तींमध्ये जागरूकता निर्माण करू शकलो, नागरिकांना अर्थपूर्णरित्या या उपक्रमात सामील करून घेऊ शकलो आणि आपले रस्ते सुरक्षित ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या आमच्या वाहतूक पोलिसांना आवश्यक ते सहकार्य देऊ शकलो. या उपक्रमाच्या यशामधून अधिक सुरक्षित आणि अधिक जबाबदार शहरे निर्माण करण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. समाजासाठी सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या आमच्या प्रयत्नांवर आम्ही कायम ठाम आहोत,”
रस्त्यावरील प्रत्येक व्यक्तीसाठी अधिक सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी या मोहिमेमध्ये बहुआयामी दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. या प्रकल्पाची सांगता पुण्यात एका अधिकृत हस्तांतरण सोहळ्याने झाली.
मोहिमेचे प्रमुख यश:
·समाजाचे प्रबोधन: या जागरूकता मोहिमेने १०,००० हून अधिक विद्यार्थी आणि नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना वाहतूक नियम, पादचाऱ्यांची सुरक्षा आणि प्रथमोपचार पद्धतींविषयी अत्यंत महत्त्वाची माहिती दिली.
· मोठ्या प्रमाणावर पोहोच: ब्रँडेड पोलिस बूथवर या मोहिमेचा संदेश सांगणारे बॅनर्स बसवण्यात आले, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर व्यक्तींवर या संदेशाचा प्रभाव पडला.
· उदात्त हेतूसाठी सर्जनशीलता: रस्ता सुरक्षेच्या संकल्पनेवर आधारित चित्रकला स्पर्धेत १,००० व्यक्तींनी सहभाग घेतला. या सर्जनशील आणि आकर्षक माध्यमामुळे संपूर्ण समाजात रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती निर्माण झाली.
· वाहतूक पोलिसांसाठी सहकार्य: रस्ता सुरक्षेप्रती असलेली कटिबद्धता दर्शवत एकूण ७५ नवीन वाहतूक पोलिस बूथ बसवण्यात आले, यापैकी ५५ पुण्यात उभारण्यात आले आहेत. यामुळे वाहतूक पोलिसांची रस्त्यावरील उपस्थिती स्पष्टपणे दिसण्यास मदत झाली असून त्यांची सुरक्षा आणि कामाच्या परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे.
एकत्रितपणे, हे सर्व उपक्रम रस्ता सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी या मोहिमेचा व्यापक दृष्टिकोन निदर्शनास आणतात. आरआर काबेल आणि एलिक्सिर फाउंडेशन यांच्यामधील सहयोग कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचे उत्कृष्ट उदाहरण आहे, जे वाहतूक पोलिसांना सहकार्य करणे आणि नागरिकांमध्ये जबाबदारीची भावना जोपासण्याच्या त्यांच्या संयुक्त कटिबद्धतेला सादर करतात.


