42.5 C
New Delhi
Tuesday, June 30, 2026
Homeमहाराष्ट्रधामणीत खंडोबाला नागीणीच्या पानाचे लेपन, व फळ फुलांची आरास...

धामणीत खंडोबाला नागीणीच्या पानाचे लेपन, व फळ फुलांची आरास…

मंचर : धामणी(तालुका आंबेगांव) येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा मंदिरात स्वयंभू सप्तशिवलिंगाचा व खंडोबा.म्हाळसाई.व बाणाईच्या सर्वांगसुंदर मुखवट्यांना नागीणीच्या पानाचे लेपन व फळ फूल सोहळा उत्साहात साजरा झाला.निज जेष्ठ पौर्णिमेनिमित्त (वटपौर्णिमा )पारंपारिक पूजेला नागीणीच्या पानाचे लेपन व फळ फूल सोहळ्यासाठी मंदिराचे मुख्य गाभाऱ्यात

झेंडू.अष्टर व फळाचा वापर करण्यात आला. सरत्या उन्हाळी महिण्याचे उन्हापासून देवाला थंडावा मिळावा,या भावनेतून स्वयंभू सप्तशिवलिंगाला व मुखवट्यांना नागीणीच्या पानाचे लेपन करुन गाभार्‍यात सुगंधी फुलांची व फळांची आरास करण्यात आली होती. यामुळे मंदिर परिसर भक्तिने आणि सुगंधाने न्हाऊन निघाला होता. निज जेष्ठ महिण्यातील पौर्णिमेच्या मुहर्तावर सोमवारी (29 जून२६) शेकडो भाविकांनी “सदानंदाचा येळकोट,जय मल्हारच्या नामघोषात धामणी (तालुका आंबेगांव) येथील पुरातन श्री म्हाळसाकांत खंडोबाचे दर्शन घेतले. धामणीच्या पुरातन खंडोबा मंदिरात पहाटे चार वाजता घंटानाद झाला.त्यानंतर भगवान बढेकर व साधना बढेकर. राजेद्र बढेकर व उषा बढेकर. मधुकर बढेकर व मनिषा बढेकर. खंङू दिनकर बढेकर व नंदा बढेकर.(जारकरवाङी)डॉ.शुभम रोङे व ज्योती रोडे.गुलाब बढेकर व मनिषा बढेकर. संतोष एकनाथ जाधव व मनिषा जाधव.दिनकर गाढवे व शैला गाढवे.(धामणी )राजेंद्र गणपत जाधव व गायञी जाधव (द्रोणागिरी धामणी)राजेंद्र दहिवाळ व रेश्मा दहिवाळ (पारगाव )गणेश कान्हू विधाटे व सुप्रिया विधाटे. (ठाणे. मुंबई ).वसंत जाधव व जयश्री जाधव (नारायणगाव )गोरक्षनाथ कडवे सर व सुरेखा कडवे (राजगुरूनगर. खेड.)13 जोडप्यांच्या हस्ते दुग्धाभिषेक व रुद्राभिषेक संपन्न झाला. यावेळी खंडेराय. म्हाळसाई. बाणाई व जोगेश्वरीच्या देखण्या मूर्तीना वस्रालंकार व सुंगधी फुलांचे हार घालण्यात आल्यानंतर देवस्थानाचे सेवेकरी दादाभाऊ भगत.प्रभाकर भगत.सुभाष तांबे.शांताराम भगत.नामदेव भगत.राजेश भगत.राहूल भगत.अनिरुध्द वाळूंज. यांच्याकडून स्वयंभू सप्तशिवलिंग आणि पंचधातूच्या सर्वांगसुंदर देखण्या खंडोबा.म्हाळसाई व बाणाईच्या मुखवट्यावर सुवासिक केशर व सुंगधी दवण्याचे अत्तरमिश्रित केलेल्या नागीणीचे पानाचे लेपन करण्यात आले.त्यानंतर खंडेरायाला नैवेद्य दाखवण्यात येऊन शेकडो भाविकांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली.पौर्णिमेच्या अभिषेकाचे पौरोहित्य प्रमोद देखणे यांनी केले.मंदिराच्या गाभार्‍यात झेंडू.गुलाब.अष्टरच्या फुलांची व नागिणीच्या पानाची सजावट धामणीच्या लोकनियुक्त सरपंच प्रतिक्षा जाधव व अशोक(भिकाजी) जाधव यांचे सौजन्याने केलेली होती.पहाटे मंदिरात स्वयंभू सप्तशिवलिंगाला नागीणीच्या पानाचे लेपन केल्यानंतर उपस्थित भाविकांच्या कपाळाला भंडारा लावण्यात आला.आरती झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. यावेळी भाविकाना अभिजीत जाधव पाटील. विक्रम जाधव पाटील. अनिकेत जाधव पाटील व अक्षय जाधव पाटील यांच्या वतीने अल्पोपहाराची व्यवस्था केलेली होती. जेष्ठ महिण्यातील पौर्णिमेच्या निमित्ताने पंचक्रोशीतील भाविक खंडोबाचे, दशनासाठी व तळी भंङार करण्यासाठी कुटुंबियासह आलेले दिसत होते.अधूनमधून तुरळक पावसाच्या सरी येत होत्या. चार चाकी. दुचाकीने भाविकांची ये जा सुरु होती. भाविक मुसळधार पावसाच्या प्रतिक्षेत असल्याचे आढळून आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
42.5 ° C
42.5 °
42.5 °
21 %
5kmh
99 %
Tue
43 °
Wed
41 °
Thu
35 °
Fri
33 °
Sat
40 °

Most Popular

Recent Comments