37.7 C
New Delhi
Sunday, July 5, 2026
HomeTop Five Newsविद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘विनायकी

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘विनायकी

विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती’; ऑनलाइन अर्जाची अंतिम मुदत १५ जुलै

पुणे: स्व. माजी कार्यसम्राट आमदार विनायक (आबा) निम्हण यांच्या जयंतीनिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने सलग चौथ्या वर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘विनायकी:विनायक गौरव शिष्यवृत्ती’ उपक्रमासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, ५ जुलै ते १५ जुलै २०२६ या कालावधीत पात्र व गुणवंत विद्यार्थ्यांनी www.sunnynimhan.com या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरावेत, असे आवाहन नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी केले आहे.

स्व. विनायक (आबा) निम्हण यांनी आपल्या संपूर्ण सार्वजनिक जीवनात शिक्षण, आरोग्य ,कला आणि सामाजिक विकास या क्षेत्रांना सर्वोच्च प्राधान्य दिले. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, हा त्यांचा कायम प्रयत्न होता. त्यांच्या याच सामाजिक विचारांचा वारसा जपत सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून विविध शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत.

‘विनायकी: विनायक गौरव शिष्यवृत्ती’ हा उपक्रम केवळ आर्थिक मदत देणारा नसून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा सन्मान करणारा आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला नवी दिशा देणारा उपक्रम आहे. पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेल्या पण थोडक्यात शिष्यवृत्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांसह पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा, पीएच.डी. तसेच आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, मेडिकल, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, कृषी, फार्मसी, मॅनेजमेंट, लॉ, जर्नालिझम आदी शाखांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

गेल्या तीन वर्षांत या उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक आधार मिळाला असून त्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे. यंदाही अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत या उपक्रमाचा लाभ पोहोचावा, यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे.

ऑनलाइन अर्ज केल्यानंतर पात्र विद्यार्थ्यांच्या मुलाखती १८ जुलै (शनिवार), १९ जुलै (रविवार) आणि २६ जुलै (रविवार) २०२६ रोजी सोमेश्वर फाउंडेशन कार्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे होणाऱ्या भव्य ‘विनायकी: विनायक गौरव शिष्यवृत्ती प्रदान समारंभात’ मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

“झेप तुमची… साथ आमची!” या ब्रीदवाक्याखाली आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमासाठी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याची अंतिम मुदत येण्याची वाट न पाहता तत्काळ www.sunnynimhan.com या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पालक, शिक्षक, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांनी ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ मिळवून द्यावा, असेही आवाहन नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
37.7 ° C
37.7 °
37.7 °
36 %
0.8kmh
73 %
Sat
38 °
Sun
43 °
Mon
40 °
Tue
39 °
Wed
39 °

Most Popular

Recent Comments