आजच्या काळात हृदयविकाराचा झटका खूपच सामान्य झाला आहे. तरुणांमध्येही हृदयविकाराचा झटका येण्याची समस्या दिसून येत आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, बैठी जीवनशैली, शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान, हृदयाच्या धमन्यांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात आणि रक्त प्रवाह अचानक थांबतो. त्यामुळे हृदयाचे स्नायू कमकुवत होऊन हळूहळू काम करणे बंद करतात. याला मायोकार्डियल इन्फेक्शन म्हणतात.
ब्रिटीश हार्ट फाऊंडेशनच्या मते, पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये काही असामान्य लक्षणे दिसतात. जी महिलांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणं असू शकतात. म्हणूनच तज्ज्ञ सांगतात की, महिलांनी या लक्षणांची काळजी घेतली तर येणाऱ्या काळात जीवाला होणारा धोका टाळता येईल. जाणून घेऊयात महिलांमध्ये हृदयविकाराच्या सुरुवातीला कोणती लक्षणं जाणवतात.
पचन समस्या : द मिररच्या मते अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात असे म्हटले आहे की, मळमळणे हे देखील पुरुष आणि स्त्रियांच्या हृदयविकाराच्या झटक्याचे मुख्य लक्षण असू शकते. संशोधनात असे दिसून आले आहे की, हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे असलेल्या ३४ महिलांना मळमळ होते. तर २२ पुरुषांमध्ये मळमळण्याची लक्षणं जाणवली. जबडा, मान, पाठ, हात किंवा खांदे दुखणे हे हृदयविकाराच्या लक्षणांपैकी एक चेतावणीचे लक्षण आहे.
हातांमध्ये मुंग्या येणे : हातांना मुंग्या येण्याची, सूज येण्याची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये चुकीच्या स्थितीत झोपणे किंवा हातांचा अतिवापर करणे. संशोधनानुसार असे आढळून आले आहे की, एक किंवा दोन्ही हातांमध्ये अचानकपणे बधिरपणा जाणवणे हे हृदयविकाराचा झटक्याचे लक्षण असू शकते.
इतर लक्षणं : ब्रिटीश हार्ट फाऊंडेसन महिलांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याची इतर लक्षणं देखील दिसतात. जसे की, छातीत दुखणे, अस्वस्थता जाणवणे, छातीत दाब निर्माण होणे यांसारखी लक्षणे दिसल्यास त्वरि संबंधित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
हृदयविकाराच्या झटक्याची ’ही’ लक्षणं महिलांमध्ये आधीच दिसतात
वेळीच सावध व्हा!
RELATED ARTICLES
New Delhi
mist
15.1
°
C
15.1
°
15.1
°
94 %
4.6kmh
75 %
Fri
16
°
Sat
21
°
Sun
21
°
Mon
22
°
Tue
22
°