मुंबई- येत्या २ जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिज या ठिकाणी टी-२० वर्ल्डकपचं आयोजन करण्यात आलं आहे. नुकतंच या वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. अशातच गुरुवारी रोहित शर्मा आणि सिलेक्टर अजित आगरकर यांची प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली. यावेळी केएल राहुलला टी-२० वर्ल्डकपच्या टीममधून का वगळण्यात आले हे स्पष्ट करण्यात आले आहे.या वर्षी होणाऱ्या टी२० वर्ल्डकपसाठी २०२४ साठी टीम इंडिया जाहीर झाला आहे. आता भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने या प्रकरणाबाबत मुंबईत पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत रोहित आणि आगरकर यांना केएल राहुलला टीममधून का वगळण्यात आलं याबाबत प्रश्न विचारण्यात आला.
केएल राहुलला वर्ल्डकपच्या टीममध्ये संधी का नाही?
पत्रकार परिषदेत केएल राहुलला वर्ल्डकपच्या टीममध्ये स्थान का मिळालं नाही, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर आगरकर म्हणाले, ’केएल हा महान खेळाडू आहे. आम्ही मिडल ऑर्डर फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंचा विचार करत आहोत. केएल टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करतो. तर ॠषभ पंत पाचव्या क्रमांकावर खेळणार आहे. संजू सॅमसनकडेही थोड्या खालच्या क्रमांकावर खेळण्याची क्षमता आहे.आगरकर पुढे म्हणाले की, आम्ही खेळाडूंपेक्षा पोकळी भरून काढण्याचा विचार केला. रिक्त असलेल्या स्लॉटमध्ये खेळाडूंना सेट करण्यात आलं. आम्ही अशा खेळाडूंच्या शोधात होतो जे डावाच्या शेवटी जास्तीत जास्त धावा करू शकतील.
कोहलीसंदर्भात काय म्हणाले आगरकर?
या पत्रकार परिषदेत कोहलीच्या स्ट्राईक रेटवर प्रश्न उपस्थित केला गेला. यावेळी रोहित शर्मा हसायला लागला. यावर आगरकर म्हणाले, कोहलीच्या स्ट्राईक रेटबाबत आम्ही सध्या काहीही विचार करत नाही. तो जबरदस्त फॉर्मामध्ये आहे. आयपीएलमध्येही त्याने खूप रन्स केले आहेत. अनुभव आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. एका सामन्यात २२० रन्स झाले तर त्या स्ट्राईक रेटशी बरोबरी करू शकणारे फलंदाज किंवा खेळाडू आमच्या टीममध्ये आहेत. आमच्या टीममध्ये बराच समतोल आहे, त्यामुळे कोहलीच्या स्ट्राईक रेटकडे लक्ष देण्याचा विचारही केला नाही.
…म्हणून केएल राहुलला टीममध्ये संधी नाही!
अजित आगरकर यांनी केल स्पष्ट
New Delhi
overcast clouds
30.1
°
C
30.1
°
30.1
°
67 %
1.4kmh
100 %
Thu
30
°
Fri
33
°
Sat
36
°
Sun
37
°
Mon
35
°