पिंगळे गुरव – पिंगळे गुरव येथे काव्यात्मा साहित्य परिषद, पुणे यांच्या वतीने विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुस्तक, सन्मान चिन्ह यांसह गौरव करण्यात आला. हा सन्मान ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.कार्यक्रमात ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण यांनी ‘परिवर्तनाच्या चळवळीचा धागा पकडून’ जीवनाचा मुलमंत्र दिला. त्यांनी म्हणाले, “ज्यांना कुणीही नाहीत, मुले-बाळे नाहीत, त्यांना वंशासाठी झाडे लावावीत. म्हणजे आयुष्यात निराशा येणार नाही.” वृक्षांची उपमा देत म. भा. चव्हाण यांनी सांगितले की, “वृक्ष स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, त्यातून माणसांनी शिकायला हवे.कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात पुरुषोत्तम सदाफुले यांनी सांगितले की, “वृक्ष नेहमी दुसऱ्यांना छाया देतात, तसेच चांगल्या विचारांचे माणसंच समाजात प्रकाश निर्माण करतात, जे समाजाला दिशा देतात.
वृक्षमित्र अरुण पवार यांनी सांगितले, “आयुष्याची किंमत करायची असेल, तर वृक्षांची लागवड मोठ्या प्रमाणात केली पाहिजे. तेव्हाच आयुष्य सुखकर होईल.
अण्णा जोगदंड यांनी पुरस्कार स्वीकारताना म्हटले, “गांधीवादी विचारांचे शिक्षणतज्ञ, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कै. बाळासाहेब भारदे यांचा समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मी गांधीवादी विचारांची जबाबदारी अधिक कर्तव्यदक्षतेने पार पडू शकेन.”
कार्यक्रमात विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना सन्मानित करण्यात आले, ज्यात अण्णा जोगदंड (कै. बाळासाहेब भारदे समाजभूषण पुरस्कार), कवयित्री शोभाताई जोशी (काव्यसाधना जीवन गौरव पुरस्कार), सुहास घुमरे (गझलकार प्रकाशदादा बनसोडे पुरस्कार), कवी किसन म्हसे (काव्य प्रतिभा पुरस्कार), कवी जितेन सोनवणे (शब्दप्रभू काव्य पुरस्कार), अरविंद सगर (गझल काव्य विशेष सन्मान पुरस्कार), विजय जाधव (काव्यात्मा जनजागृती सेवा पुरस्कार), कामुदास चव्हाण (कर्तव्यदक्ष सुरक्षारक्षक पुरस्कार), ज्ञानेश्वर किर्दंत (महात्मा ज्योतिबा फुले समाज भूषण पुरस्कार), जाकीर लतिफ मुलानी (काव्यात्मा शंमप्रतिष्ठा पुरस्कार), राहूलदादा जाधव (काव्यात्मा साहित्य सेवा दर्पण पुरस्कार) आणि शरद काणेकर (काव्यात्मा साहित्य सेवा दर्पण पुरस्कार) यांचा समावेश होता.
नंतर काव्य जागर संमेलन प्रसिद्ध कवी अनिल दिक्षित यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. अनिल दिक्षित यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले, “कवितेच्या माध्यमातून माणसा-माणसाला जोडून ठेवण्याची ताकद आहे, म्हणूनच कविता समाजकल्याणाच्या हिताचा विचार करत असते.”
राज्यभरातून आलेल्या 35 कवी आणि कवयित्रींनी दमदार कविता सादर केल्या. या कार्यक्रमात ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण, पुरुषोत्तम सदाफुले, शंकीत चौगुले, महेंद्र भारती, वृक्षमित्र अरुण पवार, सविता इंगळे, प्रसिद्ध कवी अनिल दिक्षित, सुरेश वाकचौरे, महेमूदा शेख यांचा विचारपीठावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुरेखा हारे, संगिता जोगदंड, दत्तूभाऊ ठोकळे, संजय साळुंखे, महेश क्षिरसागर आणि मराठवाडा जनविकास संघाच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य मोलाचे ठरले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आत्माराम हारे यांनी केले, सूत्रसंचालन दिनेश भोसले यांनी केले आणि आभारप्रदर्शन संजय साळुंखे यांनी केले.