40.2 C
New Delhi
Tuesday, June 23, 2026
HomeBlogप्रभाग ९ मधील ‘मिसिंग लिंक’ कामांना वेग देण्याचे निर्देश;

प्रभाग ९ मधील ‘मिसिंग लिंक’ कामांना वेग देण्याचे निर्देश;

पुणे : कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ मधील प्रलंबित ‘मिसिंग लिंक’ रस्ते प्रकल्पांना गती देण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले आहेत. सोमवारी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी या कामांचा सविस्तर आढावा घेतला.

सोमेश्वरवाडी, सुतारवाडी, पाषाण, बाणेर आणि बालेवाडी परिसरातील विविध ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पांबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. जमीन अधिग्रहण आणि इतर कामांसाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध असूनही कामे संथगतीने सुरू असल्याबद्दल मंत्री पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.

अधिकाऱ्यांनी जमीन अधिग्रहणातील तांत्रिक अडचणी तसेच अतिक्रमणांच्या समस्यांची माहिती दिली. त्यावर प्रतिक्रिया देताना पाटील यांनी, “निधी उपलब्ध असताना कामे रखडणे योग्य नाही. प्रशासनाने ठोस कृती आराखडा तयार करून कामांना तातडीने वेग द्यावा,” असे स्पष्टपणे सांगितले.

बैठकीनंतर आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांना संबंधित भागांची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार मंगळवारी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे आणि बनकर यांनी पाषाण, सुतारवाडी, बाणेर आणि बालेवाडी परिसरातील मिसिंग लिंकच्या ठिकाणांची पाहणी केली. यावेळी तांत्रिक अडथळे, अतिक्रमणे आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आवश्यक प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, या मिसिंग लिंक प्रकल्पांची पूर्तता झाल्यास पाषाण, सुतारवाडी, बाणेर-बालेवाडी परिसरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा दिलासा मिळणार आहे. पर्यायी मार्ग उपलब्ध झाल्यामुळे वाहतूककोंडी कमी होऊन नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी तसेच आपत्कालीन सेवांना मोठा फायदा होईल. परिसराचा सर्वांगीण विकास, वेळेची बचत आणि सुरक्षित, ट्रॅफिकमुक्त वातावरण निर्माण होण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरेल, अशी अपेक्षा मंत्री पाटील यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
40.2 ° C
40.2 °
40.2 °
21 %
3.5kmh
0 %
Tue
41 °
Wed
40 °
Thu
43 °
Fri
43 °
Sat
44 °

Most Popular

Recent Comments