12.1 C
New Delhi
Thursday, December 5, 2024
HomeBlogशैक्षणिक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे नाविन्यता घडवून आणण्यासाठी टीच फॉर इंडिया सज्ज

शैक्षणिक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे नाविन्यता घडवून आणण्यासाठी टीच फॉर इंडिया सज्ज

३ दिवशीय स्कूल्स ऑफ टुमारो' परिषदेचे यशस्वीरीत्या आयोजन

पुणे : शैक्षणिक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे नाविन्यता घडवून आणण्यासाठी टीच फॉर इंडियातर्फे पुण्यात बाणेर येथील बंटारा भवन येथे ३ दिवशीय स्कूल्स ऑफ टुमारो’ परिषदेचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात आले होते. स्‍कूल्‍स ऑफ टूमारो (एसओटी) समिटमध्‍ये जगाच्‍या विविध भागांमधील १०० हून अधिक शाळा प्रमुख आणि पुणे व मुंबईमधील ३०० हून अधिक शिक्षणतज्ञ शिक्षणाला नवीन आकार देण्‍याकरिता अद्वितीय इव्‍हेण्‍टसाठी एकत्र आले. द आकांक्षा फाऊंडेशन,आयटीच स्‍कूल्‍स, टीच फॉर ऑल, टीच फॉर इंडिया आणि द सर्कल इंडिया या पाच संस्‍था एकत्रित एसओटीचे आयोजन करतात. या संस्‍था विद्यार्थ्‍यांना त्‍यांच्‍या संपूर्ण क्षमतेचा फायदा घेण्‍यास सक्षम करण्‍यासाठी काम करतात. ग्रुप शैक्षणिक चळवळीला चालना देत आहे, ज्‍यामधून सर्व मुलांना दर्जेदार शिक्षण उपलब्‍ध होण्‍याची, तसेच ते प्रगती करण्‍यासोबत त्‍यांच्‍या कुटुंबांना दारिद्र्यतेमधून बाहेर काढण्‍यास सक्षम असण्‍याची खात्री मिळेल.

तीन दिवसीय समिटमध्‍ये सहभागींसाठी अर्थपूर्ण परस्‍परसंवाद, सर्वसमावेशक कार्यशाळा, हॅकेथॉन्स, मास्‍टरक्‍लासेस आणि शालेय भेटींचा समावेश होता. व्‍यावहारिक माहिती आणि टूल्‍सनी त्‍यांना झपाट्याने बदलत असलेल्‍या विश्‍वासाठी शाळांमध्‍ये नवीन सुधारणा करण्‍यास सुसज्‍ज केले. समिटमधील प्रवक्‍त्‍यांमध्‍ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापालिका आयुक्‍त शेखर सिंग (आयएएस), द आकांक्षा फाऊंडेशन व टीच फॉर इंडियाचे संस्‍थापक शाहीन मिस्‍त्री, रॉकेट लर्निंगचे सह-संस्‍थापक उत्‍सव खेरिया, शिक्षालोकमच्‍या सह-संस्‍थापक खुशबू अवस्‍थी यांचा समावेश होता. त्‍यांनी शैक्षणिक प्रणालीमध्‍ये सतत नाविन्‍यता आणि वाढीसाठीच्या गरजेवर भर दिला. तसेच, त्‍यांनी शाळांमधील उद्देशपूर्ण स्‍थानिक नेतृत्‍व आणि सर्व भागधारकांकडून सहयोगात्‍मक कृतीच्‍या माध्‍यमातून शैक्षणिक समानतेला चालना देण्‍याबाबत त्‍यांचे मत व्‍यक्‍त केले.

टीच फॉर इंडियाचे संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी शाहीन मिस्‍त्री म्‍हणाले, “आमचा विश्‍वास आहे की, शिक्षणामध्‍ये परिवर्तनाची सुरूवात शिक्षणाला चालना देणाऱ्या प्रमुखांना सक्षम करण्‍यासह होते. स्‍थानिक माहितीसह जागतिक कौशल्‍य एकत्रित करत आपण शाळा निर्माण करू शकतो, ज्‍या प्रत्‍येक मुलाला दर्जेदार शिक्षण देतील आणि उज्‍ज्‍वल भविष्‍य घडवतील, जेथे प्रत्‍येक विद्यार्थ्‍याला प्रगती करण्‍याची संधी मिळेल. टीच फॉर इंडियामध्‍ये आमचा ठाम विश्‍वास आहे की, उज्‍ज्‍वल भारत घडवण्‍याची सुरूवात शाळेतील वर्गामधून होते. आपण शिक्षणाचा दर्जा वाढवला पाहिजे आणि शिक्षणामध्‍ये सामील असलेल्‍या प्रत्‍येकाला भविष्‍यासाठी कौशल्‍यांसह सुसज्‍ज केले पाहिजे.”

टीच फॉर इंडियाच्‍या अॅल्‍युम्‍नी इम्‍पॅक्‍टचे संचालक रामभद्रन सुंदरम यांनी शैक्षणिक सुधारणांना चालना देण्‍यासाठी प्रमुख समस्‍यांचे निराकरण करण्‍याचे महत्त्‍व निदर्शनास आणले. ते म्‍हणाले, “भारतातील शाळांना सर्व मुलांना दर्जेदार शिक्षण देण्‍यासाठी नवीन आकार देण्‍याकरिता पद्धतशीर परिवर्तनाची गरज आहे. ‘स्‍कूल्‍स ऑफ टूमारो’ अद्भुत उपक्रम आहे, जो शिक्षणामध्‍ये परिवर्तन घडवून आणण्‍यावर आणि नेतृत्‍वाला चालना देण्‍यावर लक्ष केंद्रित करतो. आमचा शिक्षणतज्ञांना भविष्‍यासाठी सर्वोत्तम शाळा निर्माण करण्‍यास सक्षम करण्‍याचा आणि आघाडीची सामाजिक प्रभाव संस्‍था म्‍हणून आमची भूमिका अधिक प्रबळ करण्‍याचा मनसुबा आहे.”

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे (पीसीएमसी) महापालिका आयुक्‍त शेखर सिंग (आयएएस) यांनी शाळांमध्‍ये परिवर्तन घडवून आणण्‍याच्‍या अजेंडाला जागतिक ट्रेण्‍ड्सशी संलग्‍न करण्‍याच्‍या महत्त्वावर भर दिला. ते म्‍हणाले, “स्‍कूल्‍स ऑफ टूमारो सर्वोत्तम उपक्रम आहे आणि नाविन्‍यता शिक्षणाचा महत्त्वपूर्ण भाग कशाप्रकारे बनू शकते हे ओळखणे महत्त्‍वाचे आहे. आपण शाळांमध्‍ये परिवर्तन घडवून आणण्‍याच्‍या आपल्‍या प्रयत्‍नांना जागतिक ट्रेण्‍ड्स व दृष्टिकोनांशी संलग्‍न करण्‍याची गरज आहे. ‘स्‍कूल्‍स ऑफ टूमारो’ संमेलन नाविन्‍यता व समानता एकमेकांशी कशाप्रकारे पूरक असू शकतात हे समजण्‍यासाठी सर्वोत्तम पाऊल आहे, परिणामत: विद्यार्थ्‍यांना त्‍यांच्‍या संपूर्ण क्षमतांची जाणीव होण्‍यास मदत होईल. मी आशा करतो की, अधिकाधिक शिक्षणतज्ञ व प्रमुख एकत्र येत ही संकल्‍पना शेअर करतील आणि शिक्षकांना व विद्यार्थ्‍यांना त्‍यांच्‍या संपूर्ण क्षमतेची जाणीव होण्‍यास मदत करतील.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
12.1 ° C
12.1 °
12.1 °
66 %
1.5kmh
0 %
Thu
25 °
Fri
25 °
Sat
25 °
Sun
25 °
Mon
20 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!