पुणे- सध्या बनावट औषधांचा सुळसुळाट सुरु असल्याचे शहरातून दिसून येत आहे. पुण्यात बनावट बनावट औषधांची विक्रीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणी मोहीम हाती घेतली असून पुणे व पिंपरी-चिंचवडमधील तीन औषध विक्रेत्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.आजार बरा करण्याच्या नावाखाली औषध विक्री केली जात आहे. या बोगस औषधांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. या औषधांचा प्रसार करण्यासाठी खोट्या जाहिराती देखील केल्या जात जातात. औषधे व जादूटोणादी (आक्षेपार्ह जाहिराती) कायद्यांतर्गत ५३ आजारांवरील उपचाराबाबत जाहिरात करण्यास प्रतिबंध असतांना सुद्धा बनावट औषधांची विक्री केल्या जात असल्याचं उघड झालं आहे. अन्न व औषध प्रशासनाने अशी औषधे विकणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली असून एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत तीन औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तब्बल ५० हजार रुपयांची बनावट औषधं जप्त करण्यात आली आहे.
तीन औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे. न्यू मारुती आयुर्वेद द्वारे अमृत नोनी डी प्लस या बोगस औषधाची विक्री केली जात होती. या औषधाच्या डब्बीवर मधुमेह बरा करण्याचा दावा करण्यात आला होता. अन्न व औषध प्रशासनाने या विक्रेत्यावर कारवाई करत तब्बल ३६५०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.