पंढरपूर :- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस चंद्रभागा नारायण भांडे या भाविकांने दीड किलो वजनाचा चांदीचा टोप अर्पण केल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
त्याबद्दल देणगीदार भाविकांचा मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे विभाग प्रमुख ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी श्री विठ्ठलाची प्रतिमा, उपरणे, दैनंदिनी व दिनदर्शिका देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी देणगीदार यांचे कुटुंब उपस्थित होते. सदरचा चांदीचा टोप 1 किलो 500 ग्रॅम वजनाचा असून त्याची अंदाजे किंमत 1 लाख 33 हजार होत आहे. देणगीदार भाविक हे राजोर सावरकुंटे तालुका अकोला जिल्हा अहिल्यानगर येथील रहिवासी आहेत.
