30.7 C
New Delhi
Wednesday, July 30, 2025
HomeBlogसांस्कृतिक कला महोत्सव २०२४ ला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सांस्कृतिक कला महोत्सव २०२४ ला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रदेशाध्यक्षा अभिनेत्री प्रिया बेर्डे, भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने आयोजन 

पुणे : महाराष्ट्राच्या लोककलेला दीर्घ परंपरेचा वारसा आहे. मात्र अलीकडच्या काळात बदलत्या तंत्रज्ञानाच्या नावाखाली काही ठिकाणी लोककलेला विभस्त स्वरूप आले आहे. हे टाळण्यासाठी आणि आपली अस्सल लोककला, लावणी काय आहे? हे तरुण पिढीला दाखवणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर लोक कलावंतांना प्रोत्साहान देण्यासाठी  भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आयोजित सांस्कृतिक कला महोत्सव २०२४ लावणी महोत्सव व महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

भारतीय जनता पार्टी BJP सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्रच्या प्रदेशाध्यक्षा अभिनेत्री प्रिया बेर्डे priya berde यांच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह, पद्दमावती,पुणे येथे करण्यात आले होते.ह्या प्रसंगी अभिनेत्री मेघा धाडे, दत्तात्रय कोल्हे,शंतनू गंगणे, स्वानंदी बेर्डे, अभिनय बेर्डे, ऍड. केदार सोमण, ऍड मंदार जोशी,कलाकार आणि निर्माते मंगेश मोरे, उद्योजक व निर्माते अमर शेठ गवळी उपस्थित होते.

सकाळी  ११ ते रात्री १० यावेळेत रंगलेल्या या सांस्कृतिक  महोत्सवात लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, लावणी सम्राज्ञी सिमा पोटे नारायणगावकर, सुधाकर पोटे नारायणगावकर, अभिनेत्री सुरेखा कुडची surekah kudachi, अभिनेत्री मेघा घाडगे, अकलूज लावणी महोत्सव विजेता ग्रुप जय अंबिका कला केंद्र, सणसवाडी ची वैशाली समसापुरकर ग्रुप चा संगीतबारी कार्यक्रम, नितीन मोरे व महेश भांबीड दिग्दर्शित महाराष्ट्राची लोकधारा, ढोलकीच्या तालावर फेम शुभम बोराडे अशा सुप्रसिद्ध लोक कलावंतांच्या कार्यक्रमाची मेजवानी पुणेकरांना मिळाली.या महोत्सवात लोककलेसाठी ज्यांनी मोलाचे योगदान देणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या जेष्ठ तमाशा सम्राज्ञी मंगला बनसोडे, अमन तांबे आर्यभूषण थियटर, ढोलकी वादक तुकाराम शितोळे, लोकगीत चंदन कांबळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी अभिनेत्री प्रिया बेर्डे  म्हणाल्या, लोककला, लावणी व स्थानिक लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय जनता पार्टी सतत प्रयत्नशील आहे. आगामी काळात भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राज्यभरात अशा प्रकारच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
30.7 ° C
30.7 °
30.7 °
68 %
4.5kmh
88 %
Wed
30 °
Thu
30 °
Fri
36 °
Sat
35 °
Sun
34 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!