पंढरपूर : नववर्षाच्या प्रारंभानिमित्त आज गुरुवारी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व गाभाऱ्यात विविध प्रकारच्या फुलांची अत्यंत आकर्षक सजावट करण्यात आली आहे. या फुलांच्या सजावटीमुळे श्रींचा गाभारा अधिकच मनमोहक व प्रसन्न दिसत असून भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.या सजावटीसाठी ऑर्किड, लिव्हडेजी, ड्रॅसेना, झेंडू, शेवंती आदी विविध प्रकारची सुमारे
एक टन फुले वापरण्यात आली आहे.



