32.8 C
New Delhi
Sunday, March 15, 2026
HomeTop Five Newsअधिकृत प्रचार कालावधीनंतर जाहिरातींवर बंदी – राज्य निवडणूक आयोग

अधिकृत प्रचार कालावधीनंतर जाहिरातींवर बंदी – राज्य निवडणूक आयोग

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी अधिकृत प्रचार कालावधी संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि इतर माध्यमांमधील सर्व निवडणूकांसंबंधित जाहिरातींवर बंदी घातली जाईल, असे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत बोलताना सांगितले.२९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, दुसऱ्या दिवशी मतमोजणी होणार आहे. संबंधित कायद्यातील तरतुदींनुसार, मतदानाची वेळ संपण्याच्या ४८ तास आधी, म्हणजेच १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता निवडणूकांचा प्रचार संपणार आहे. त्यानंतर कोणत्याही माध्यमात निवडणुकीच्या जाहिराती प्रकाशित किंवा प्रसारित केल्या जाऊ शकत नाहीत. मतदानादिवशी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल.
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकानी यांनी बैठकीत सविस्तर सादरीकरण केले. ते म्हणाले, उमेदवाराचे नाव संबंधित महानगरपालिकेच्या मतदार यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे. सूचक आणि अनुमोदक त्याच प्रभागाचे रहिवासी असले पाहिजेत, ज्या प्रभागातून उमेदवार निवडणूक लढवत आहे. पक्षीय उमेदवार आणि अपक्ष उमेदवारांना प्रत्येकी एक सूचक आणि एक अनुमोदक आवश्यक असतो. उमेदवार एकापेक्षा जास्त प्रभागांतून उमेदवारी अर्ज दाखल करू शकतो, परंतु तो फक्त एकाच जागेवरून निवडणूक लढवू शकतो. एका जागेसाठी जास्तीत जास्त चार उमेदवारी अर्ज दाखल केले जाऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
32.8 ° C
32.8 °
32.8 °
20 %
4.9kmh
1 %
Sun
33 °
Mon
33 °
Tue
32 °
Wed
36 °
Thu
35 °

Most Popular

Recent Comments