39.4 C
New Delhi
Saturday, June 27, 2026
HomeTop Five Newsउपमहापौर परशुराम वाडेकर यांनी केला मेट्रोने प्रवास

उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी केला मेट्रोने प्रवास

पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या १७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राज्यभर निवडणूक आचारसंहिता लागू झाली. याची माहिती पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान पदाधिकाऱ्यांना मिळाली. आचारसंहिता लागू झाल्यानंतर शासकीय वाहनांचा वापर थांबवून ती प्रशासनाकडे जमा करणे बंधनकारक असते.

याच पार्श्वभूमीवर पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी तत्काळ आपले शासकीय वाहन प्रशासनाकडे जमा करत आचारसंहितेचे पालन केले. त्यानंतर त्यांनी पुणे महानगरपालिका ते बोपोडी असा प्रवास मेट्रोने केला.

वाडेकर यांनी पुणे मनपा मेट्रो स्थानकातून प्रवास सुरू केला. शिवाजीनगर कोर्ट स्थानकावर मेट्रो बदलून त्यांनी पुढील प्रवास बोपोडीपर्यंत पूर्ण केला.

निवडणूक आचारसंहिता लागू होताच शासकीय सुविधांचा वापर टाळून सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय स्वीकारणाऱ्या उपमहापौर वाडेकर यांच्या या कृतीची महापालिका वर्तुळात चर्चा रंगली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
39.4 ° C
39.4 °
39.4 °
26 %
3.7kmh
29 %
Fri
39 °
Sat
44 °
Sun
45 °
Mon
43 °
Tue
43 °

Most Popular

Recent Comments