26.6 C
New Delhi
Tuesday, July 15, 2025
HomeTop Five Newsमहायुतीच्या महागोंधळात’ पुणे मनपा ‘अतिरिक्त आयुक्तांची २ पदे’ ९ महिन्यांपासून  रिक्तच्…! 

महायुतीच्या महागोंधळात’ पुणे मनपा ‘अतिरिक्त आयुक्तांची २ पदे’ ९ महिन्यांपासून  रिक्तच्…! 

‘कृती-शुन्य’ कारभाराची पुणेकरांना प्रचिती..!  ⁃काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी 

पुणे : महायुतीच्या महागोंधळाच्या’ कारभाराची प्रचिती राज्यातील जनते बरोबर पुणेकरांना येऊ लागली आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे प्रशासकीय कामकाजात लक्ष देण्याऐवजी ‘राजकीय  धुळवडीत’ अधिक मग्न असून; डॉ  बाबासाहेब आंबेडकर व डॉ.  मनमोहनसिंग यांचा काँग्रेसने ‘कथित अवमान (?) करण्याची कथानके’ रचण्याचे निष्फळ प्रयत्न करीत, ७५ वर्षां पुर्वीच्या ‘गांधी – नेहरूंच्या नावे बोटे मोडण्याचा राजधर्माचा पुरषार्थ निभावत असल्याची प्रखर टीका काँग्रेस नेते व राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी (gopal tiwari) यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात केली. 
ते पुढे म्हणाले की, फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाचा केवळ राजकीय धुळवडीसाठी वापर करू नये. तर प्रशासकीय कामासाठी देखील वापर करावा व पुणे मनपा’तील २ अतिरिक्त आयुक्त पदांच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात. 
त्यांनी पुढे म्हंटले आहे की, एप्रिल २०२४ म्हणजेच तब्बल ९ महिन्यांपासून ‘पुणे महापालिकेतील’ pmc दोन अतिरिक्त आयुक्तांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेवर प्रशासकीय शासन असल्याने, आयुक्त  राजेंद्र  भोसले rajendra bhosale यांचेवर कामाचा मोठा ताण आहे.  त्यामुळे एकमेव अतिरिक्त अतिरिक्त आयुक्त असलेल्या  पृथ्वीराज बी. पी. यांच्याकडे महापालिकेच्या सर्वच विभागांचा कारभार आहे. पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे सध्या मसुरी येथे प्रशिक्षणासाठी गेल्याने ‘पीएमपीएमएलचा अतिरिक्त पदभार’ देखील अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्याकडे देण्यात आलेला आहे. दोन अति. आयुक्त नसल्याने, अनेक विभागांच्या फाईल प्रलंबित आहेत. आरोग्य, स्वच्छता, अतिक्रमण विभाग, पाणीपुरवठा व सांडपाणी- ड्रेनेज लाईन सह अनेक अत्यावशक कामे खोळंबून असल्याने नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. महापालिकेतील महत्त्वाची संविधानिक पदे रिक्त ठेवण्यामागे व अधिकारांचे केंद्रीकरण करण्यामागे, काही आर्थिक गणिते आहेत काय (?) वा कोणत्या ॲाफर’ची वाट पाहिली जात आहे काय(?) असा उपहासात्मक सवाल केला. 
राज्यभरात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू आहेत पुण्याची जिल्हाधिकारी देखील बदलले पण 
पुणे महापालिकेला २ अतिरिक्त आयुक्त काही मिळायला तयार नाहीत. 
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करून देखील पुणे महापालिके’साठी अति आयुक्त मिळत नाहीत ही केवळ नामुष्की समजायची का ‘पुणे शहरास’ (नागपूर मेट्रो प्रमाणे प्राधान्य देणारा पुर्वीचा) आकसच् समजायचा (?) असा संतप्त सवाल ही काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला. त्यामुळे किमान पुणे शहराचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मागणीस व पर्यायाने पुणेकरांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी न्याय द्यावा अशी मागणी काँग्रेस नेते व राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली..।

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
26.6 ° C
26.6 °
26.6 °
75 %
4.8kmh
82 %
Mon
26 °
Tue
34 °
Wed
34 °
Thu
34 °
Fri
36 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!