38.6 C
New Delhi
Saturday, June 13, 2026
HomeTop Five Newsसांगवी येथील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर २५ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान ‘पवनाथडी जत्रा…

सांगवी येथील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर २५ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान ‘पवनाथडी जत्रा…

हस्तकला, खाद्यपदार्थ, गृहउद्योग उत्पादने आणि पारंपरिक वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीसाठी महिला बचत गटांना नावनोंदणीचे समाज विकास विभागाचे आवाहन….

पिंपरी,:- पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या समाज विकास विभागामार्फत दि. २५ फेब्रुवारी २०२६ ते १ मार्च २०२६ या कालावधीत सांगवी येथील पी.डब्ल्यू.डी. मैदानावर ‘पवनाथडी जत्रा’चे आयोजन करण्यात आले आहे. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, महिलांमध्ये विपणन व विक्री कौशल्यांचा विकास करणे तसेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरा आणि शहरी संस्कृतीचे जतन करणे हा या जत्रेचा मुख्य उद्देश आहे.
महापालिकेच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारी पवनाथडी जत्रा ही महिला उद्योजिकांसाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरत असून विविध हस्तकला, खाद्यपदार्थ, गृहउद्योग उत्पादने आणि पारंपरिक वस्तूंचे प्रदर्शन व विक्री यामध्ये केली जाते.
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील जत्रेसाठी सहभाग अर्जांचे वाटप व स्वीकृती दि. १० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू करण्यात आली आहे. सदर अर्ज समाज विकास विभागाकडे सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत उपलब्ध आहेत. या जत्रेकरिता जनरल, व्हेज आणि नॉन व्हेज या तीन प्रकारात स्टॉल वाटप करण्यात येणार आहेत. सहभागासाठी बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र, संबंधित महिलेचे आधार कार्ड, बँक पासबुकची प्रत व फोटो ही कागदपत्रे आवश्यक आहेत.
दि. १० फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सुमारे २,५०० अर्ज महिला बचत गट, मा. खासदार, मा. आमदार व मा. नगरसेवक यांच्याकडे वाटप करण्यात आले असून त्यापैकी १६८ अर्ज समाज विकास विभागाकडे प्राप्त झाले आहेत. अर्ज स्वीकृतीची अंतिम तारीख दि. १८ फेब्रुवारी २०२६ आहे.

——
सहभागासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:
● बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र
● संबंधित महिलेचे आधार कार्ड
● बँक पासबुकची प्रत
● फोटो
———-
कोट

पवना थडी जत्रेमध्ये महिला बचत गटांना मोठे आपल्या वस्तू व पदार्थ विक्रीसाठी मोठे व्यासपीठ मिळणार आहे. याद्वारे जास्तीत जास्त महिला बचत गटांना या जत्रेत आपल्या उत्पादनांसाठी मोठी बाजारपेठ मिळणार आहे…
-रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
38.6 ° C
38.6 °
38.6 °
23 %
2.8kmh
1 %
Sat
40 °
Sun
42 °
Mon
43 °
Tue
40 °
Wed
43 °

Most Popular

Recent Comments