33.7 C
New Delhi
Sunday, July 6, 2025
HomeTop Five Newsजगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पगडीचा ११ मार्च रोजी लोकार्पण सोहळा पार...

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पगडीचा ११ मार्च रोजी लोकार्पण सोहळा पार पडणार

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची जगातील सर्वात मोठ्या पगडीचा लोकार्पण सोहळा

जगद्गुरु संत तुकाराम महाराज्यांच्या पगडीची वर्ल्ड रेकॉर्डस् इंडिया ॲन्ड जिनिअसमध्ये होणार नोंद

संत तुकाराम महाराज बीज निमित्ताने जगातील सर्वात मोठ्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पगडीचा लोकार्पण सोहळा येत्या ११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जगद्गुरु संत तुकाराम महाराज मुख्य मंदिर, श्रीक्षेत्र देहू या ठिकाणी  पार पडणार आहे. या प्रसंगी विशेष उपस्थिती वर्ल्ड रेकॉर्डस् इंडिया ॲन्ड जिनिअस फाऊंडेशनचे सी.ई.ओ पवनकुमार सोलंकी आणि संत तुकाराम महाराज देवस्थान ट्रस्ट – श्रीक्षेत्र देहूचे अध्यक्ष ह.भ.प. पुरुषोत्तम मोरे यांची राहणार आहे. तर संकल्पना व आयोजन दिलीप सोनिगरा ज्वेलर्स यांनी केले आहे.

दिलीप सोनिगरा म्हणाले की जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पावन झालेल्या नगरीमध्ये आम्ही वास्तव करत असून याच परिसरात आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसायात स्थिर झालो आहे. तुकाराम महाराजांवर आमची नितांत श्रद्धा, प्रेम आणि स्नेह आहे.
याच सदभावनेतून आम्ही जगातील सर्वात मोठी पगडी तयार केली असून वर्ल्ड रेकॉर्डस् इंडिया ॲन्ड जिनिअस बुकमध्ये हिची नोंद होणार आहे. सदरील पगडीचा घेराव हा २२ फुटांचा असून पगडीची उंची ४ फूट आहे. तर पगडीला ४५० मीटर लांबीचा कपडा लागला आहे.

सदरील पगडी दर्शनासाठी १० तारखेला सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत दिलीप सोनिगारा ज्वेलर्स चिंचवड येथे ठेवण्यात येणार आहे. सदरील पगडी पाहण्यासाठी व दर्शनासाठी सर्वांसाठी खुली आहे. तरी जास्तीजास्त पिंपरी चिंचवडकरांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन दिलीप सोनिगरा यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
light rain
33.7 ° C
33.7 °
33.7 °
52 %
1.6kmh
96 %
Sun
34 °
Mon
32 °
Tue
38 °
Wed
34 °
Thu
30 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!