14.1 C
New Delhi
Monday, December 23, 2024
HomeTop Five Newsपिंपरी-चिंचवड शहराला पाणी कमी पडू देणार नाही - देवेंद्र फडणवीस

पिंपरी-चिंचवड शहराला पाणी कमी पडू देणार नाही – देवेंद्र फडणवीस

स्व. लक्ष्मणभाऊंचे कार्य पुढे नेण्यासाठी शंकर जगताप यांना विधानसभेवर पाठवा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चिंचवड मतदारसंघातील मतदारांना आवाहन

वाकड येथील जाहीर सभेला जमला हजारोंचा जनसमुदाय

चिंचवड, – पिंपरी-चिंचवड शहर हे वेगाने वाढणारे शहर आहे. या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात आपण शहरासाठी आंद्रा धरणातून १०० एमएलडी पाणी दिले. आणि आता भामा आसखेड धरणातून १६० एमएलडी पाणी योजनेचे भूमिपूजन केले आहे. एवढ्या पाण्याने शहराची तहान भागणार नाही. त्यामुळे आपण वेगवेगळ्या धरणातून शहराला पाणी आणण्यासाठी उपाययोजना करू. मी या शहराला पाणी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाकड येथील सभेत दिले.

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा वाकड येथील कस्पटे वस्ती येथे पार पडली.

गुजरातचे माजी गृहमंत्री प्रदीपसिंह जडेजा, खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, नवनगर प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, शिवसेनेचे उपनेते इरफान सय्यद, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, भाजपचे शहर कार्याध्यक्ष शत्रुघ्न काटे, आरपीआय महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे, शिवसेनेचे शहरप्रमुख नीलेश तरस, आरपीआयचे (आठवले) शहराध्यक्ष कुणाल व्हावळकर, माजी महापौर उषामाई ढोरे, माजी स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक ॲड. गोरक्ष लोखंडे यांच्यासह महायुतीचे सर्व माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, चिंचवड मतदारसंघात ही सभा घेत असताना लक्ष्मणभाऊंची प्रकर्षाने आठवण येते. स्व. लक्ष्मणभाऊंचा या शहराच्या विकासात सिंहाचा वाटा आहे. त्यांच्यानंतर अश्विनीताई यांनीही कमी वेळेत अनेक चांगले निर्णय घेत विकासकामे केली. लक्ष्मणभाऊंचे चिंचवडच्या विकासाचे कार्य पुढे नेण्यासाठी शंकर जगताप यांना विधानसभेत पाठवा. जो विश्वास तुम्ही लक्ष्मणभाऊ व अश्विनीताई यांच्यावर दाखवला तोच विश्वास शंकर जगताप यांच्यावर दाखवा, असे आवाहन फडणवीस यांनी उपस्थित जनसमुदायाला केले.


मेट्रो आणि रिंगरोडच्या माध्यमातून वाहतूक कोंडीची समस्या लवकरच सुटणार

चिंचवड विधानसभा मतदारसंघात वाहतूक कोंडीची समस्या मोठी आहे. ही समस्या सोडवण्यासाठी शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचे काम सुरू केले आहे. मेट्रो आणि पीएमपीएलच्या माध्यमातून नागरिकांना पब्लिक ट्रान्सपोर्ट कसा सुरू करून देता येईल यासंदर्भात काम करत आहोत. मेट्रोचे जाळे आपण विणत आहोत. त्याचबरोबर ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी २० हजार कोटी रुपयांचे रिंगरोडचे काम सुरू होणार आहे. त्यामाध्यमातून लवकरच वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे.


शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे फेक नरेटिव्ह फॅक्टरीचे मालक

विरोधकांकडून रोज उठून अफवा पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला गेले आहेत, असा अपप्रचार त्यांनी सुरु केला आहे. महाराष्ट्रात औद्योगिकीकरण होत नाही असं ते म्हणतात. मात्र आज देशात जेवढी गुंतवणूक आली आहे त्यातील 52 टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात आली आहे. याउलट महाविकास आघाडी सरकारच्या काळात कर्नाटक पहिल्या क्रमांकावर तर आपला महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर गेला होता. मात्र महायुती सरकारच्या काळात आपला महाराष्ट्र पुन्हा नंबर १ वर आणण्याचे काम आम्ही केले. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि सुप्रिया सुळे हे या फेक नरेटिव्हचे मालक असल्याचा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.


१० लाख तरुणांच्या हाताला काम व २५ लाख तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करणार

आज मोठ्या प्रमाणात ऑटोमोबाईलचे उद्योग हे पुणे, संभाजीनगर, नाशिकला आले. आज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात इको सिस्टीम तयार होत आहे. 5 लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात होत आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही एक नवीन योजना आणली आहे त्या योजनेंतर्गत १० लाख तरुणांच्या हाताला काम आणि २५ लाख रोजगाराची संधी उपलब्ध करणार आहोत. या माध्यमातून १० लाख तरुणांना १० हजार रुपयांपर्यंतचा पगार हा राज्य सरकार देईल व त्यांना प्रशिक्षण देता येईल.


आयटी पार्कबाबत अफवा पसरवून हिंजवडीची बदनामी करू नका

फेक नरेटिव्हच्या दुसऱ्या डायरेक्टर सुप्रिया सुळे म्हणतात की हिंजवडीतून आयटी उद्योग पळाले. परंतु हिंजवडीतून एकूण १६ उद्योग राज्याबाहेर न जाता राज्यातीलच नाशिक, संभाजीनगर, नागपूर या भागात गेले आहेत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या १६ उद्योगांपैकी १३ उद्योग हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेले होते. व महायुतीच्या काळात फक्त ३ उद्योग गेले आहेत. त्यामुळे फेक नरेटिव्हच्या माध्यमातून हिंजवडीला व महाराष्ट्राला बदनाम करणे बंद करा, असा सल्ला फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांना दिला आहे.


पिंपरी चिंचवड शहर हे वीर चाफेकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची लढवय्यी भूमी आहे. स्व. लक्ष्मणभाऊ जगताप गेल्यानंतर आमच्या सर्व कार्यकर्त्यांवरचे छत्र कोसळले होते. ते छत्र आणि आधार देण्याचं काम भारतीय जनता पार्टी व देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. चिंचवड विधानसभा हा विकसनशील मतदारसंघ आहे. मागील तीन टर्ममध्ये लोकनेते स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं. चिंचवड विधानसभेत जो विकास करण्याचे काम भारतीय जनता पार्टी आणि त्याचे घटक पक्ष यांनी मागील पंधरा वर्षापासून केलेला आहे, तोच विकास पुढील काळामध्ये करण्याचे मी आपल्याला आश्वासन देतो. पिंपरी चिंचवड शहराची प्रगती आपल्याला करायची आहे. शिक्षण, आरोग्य, पाणी आणि मूलभूत सुखसुविधा त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. भारतीय जनता पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आज चिंचवड विधानसभेची उमेदवारीची जबाबदारी दिली. मी निश्चितपणे या येणाऱ्या पुढील काळामध्ये चिंचवड विधानसभेचे उर्वरित प्रश्न मांडून आपला आवाज हा विधानसभेपर्यंत पोहचवेन अशी मी शाश्वती देतो. महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी आणि चिंचवड विधानसभेचा विकास करण्यासाठी महायुतीला मतदान करा असे आव्हान यावेळी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
smoke
14.1 ° C
14.1 °
14.1 °
72 %
2.1kmh
0 %
Sun
16 °
Mon
19 °
Tue
22 °
Wed
23 °
Thu
23 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!