25.5 C
New Delhi
Tuesday, July 15, 2025
HomeTop Five Newsभाजपाचे राज्यव्यापी विशेष सदस्य नोंदणी अभियान

भाजपाचे राज्यव्यापी विशेष सदस्य नोंदणी अभियान

२५ लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट्य

पुणे: भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानाला अधिक गती देण्याच्या उद्देशाने उद्या रविवारी (दि. ५) राज्यभर विशेष सदस्यता नोंदणी अभियान राबवण्यात येणार आहे. यानिमित्त एकाच दिवशी 2२५ लाखांहून अधिक सदस्य नोंदणी करण्याचे उद्दिष्ट्य आहे, अशी माहिती भाजपचे संघटन पर्व प्रभारी आमदार रविंद्र चव्हाण यांनी शनिवारी दिली.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत रवींद्र चव्हाण बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते. पक्षाचे राज्यातील सर्व मंत्री, आमदार, खासदार, नेते पदाधिकारी या अभियानात सहभागी होणार आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

रवींद्र चव्हाण म्हणाले, “या विशेष सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नागपूर येथून होणार आहेत. भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता, लोकप्रतिनिधी, नेते, आमदार ही सर्व मंडळी रस्त्यावर उतरून प्रत्येक बूथपर्यंत पोहोचून जास्तीतजास्त नागरिक भाजपाशी जोडला जाईल, यासाठी प्रयत्न करणार आहेत. या अभियानाबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या सूचनेनुसार प्रत्येक बूथवरील कार्यकर्ता २५० पेक्षा अधिक सदस्य नोंदणी करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे.”

“डिसेंबरपासून सुरू झालेल्या सदस्य नोंदणी अभियानात प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी ५० हजारांहून अधिक सदस्य नोंदणीचे लक्ष्यही ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांनंतर लागलीच संघटन पर्वाची सुरुवात झाली. त्यानंतर भाजपाचे विविध मोर्चे तसेच प्रकोष्ठ यांनी नोंदणी अभियानासाठी कार्यशाळा ही घेतल्या होत्या. भाजपा प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानामध्ये राज्यभरातून दीड कोटी सदस्य नोंदणी करण्याची सूचना बावनकुळे यांनी दिली होती. या अनुषंगाने अभियानाला अधिक गतिमान करून सक्रीय सहभागासाठी विशेष योजना आखली आहे. राष्ट्राला समर्पित भावनेने काम करणा-या भाजपाच्या या महासदस्य नोंदणी अभियानात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे,” असे आवाहनही रवींद्र चव्हाण यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
25.5 ° C
25.5 °
25.5 °
76 %
5kmh
85 %
Tue
31 °
Wed
35 °
Thu
29 °
Fri
35 °
Sat
37 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!