पुणे :- महायुतीकडून मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून अनेक नेत्यांची नागपूर येथे शपथविधी पार पडली या शपथविधीत अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली तर काही जुने चेहऱ्याला डावलण्यात आल्याचा पाहायला मिळालं. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मनगंटीवार यांना देखील डावलण्यात आल्याने ते नाराज असल्याच बोलल जात आहे.याबाबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तसेच महायुती सरकारचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारल असता ते म्हणाले की ते पक्षाचे नेते असून ते अध्यक्ष देखील राहिलेले आहे आणि त्यांनी संघटनेत देखील काम केलं आहे.त्यांच्यावर मोठी जबाबदारी येऊ शकते.पक्ष योग्य व्यक्तीच योग्य निर्णय करत असतो अस यावेळी बावनकुळे म्हणाले.पुण्यात होत असलेल्या पुस्तक महोत्सवाला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तसेच महायुतीचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट दिली.यावेळी त्यांनी याबाबत वक्तव्य केल.यावेळी ते म्हणाले की पुणे शहरात पुस्तक महोत्सव होत आहे आणि या पुस्तक महोत्सवातून काही शिकण्यासाठी मी आलो आहे.देशात कुठेही एवढं मोठं आयोजन करण्यात आलं नाही अस आयोजन पुस्तक महोत्सवात करण्यात आलं असून देशातील काण्याकोपऱ्यातून लोक या पुस्तक महोत्सवाला भेट देण्यासाठी येत आहे.आणि हे पाहण्यासाठी मी येत असल्याचं यावेळी बावनकुळे म्हणाले.काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर अनेक नेते हे नाराज असल्याचं सांगितलं जातं आहे.याबाबत बावनकुळे यांना विचारलं असता ते म्हणाले हा पक्षाचा निर्णय असतो आणि भारतीय जनता पार्टीमध्ये तर केंद्रीय पातळीवर निर्णय घेतलं जातं.तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात निर्णय घेण्याचं अधिकार हे अजित पवार आणि एकनाथ शिंदे घेत असतात.कुठेही नाराजगी ची गोष्ट नाही.पक्षामध्ये जो काही निर्णय होत असतो तो मान्य करावं लागतो.त्यामुळे सुधीर भाऊ मानले असून भुजबळ साहेब देखील मानतील अस यावेळी बावनकुळे म्हणाले.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना मोठी जबाबदारी मिळू शकते…?
RELATED ARTICLES
New Delhi
haze
20.1
°
C
20.1
°
20.1
°
37 %
3.6kmh
36 %
Tue
20
°
Wed
20
°
Thu
22
°
Fri
23
°
Sat
25
°


