30.6 C
New Delhi
Friday, October 10, 2025
HomeTop Five Newsभोसरी विधानसभेत बदल घडविण्यासाठी यंत्रणा सज्ज – अजित गव्हाणे

भोसरी विधानसभेत बदल घडविण्यासाठी यंत्रणा सज्ज – अजित गव्हाणे

भोसरीमध्ये महाविकास आघाडीचा आमदार होणार

केंद्र व बूथ प्रमुखांच्या बैठकीत कार्यकर्त्यांची दिसली एकजूट

भोसरी, : निवडणुकीमध्ये केंद्र व बुथ प्रमुखांची जबाबदारी महत्वपूर्ण असून बुथ यंत्रणा सक्षम असेल तरच निवडणूक जिंकणे सोपे होते, त्यामुळे कार्यकर्त्यांनी बूथ यंत्रणेची जबाबदारी आत्मविश्वासाने पार पाडावी असे आवाहन स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केले. आपली बूथ यंत्रणा सक्षम आहे. आता केंद्रप्रमुख या संरचनेप्रमाणे आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचे आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जो उमेदवार अधिकृतरित्या निवडणुकीला सामोरा जाणार आहे. त्यामागे ही यंत्रणा उभी करून भोसरी विधानसभेत आपल्याला बदल घडवायचा आहे. महाविकास आघाडीमध्ये एकजूट असून या एकजुटीतून भोसरी विधानसभेत महाविकास आघाडीचाच आमदार होणार असल्याचेही अजित गव्हाणे म्हणाले.

इंद्रायणीनगर येथील पर्ल बँक्वेट हॉल येथे
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बूथ व केंद्रप्रमुख, पदाधिकारी, माजी नगरसेवक यांची बैठक  पार पडली. त्यावेळी अजित गव्हाणे बोलत होते. यावेळी महाविकास आघाडीचे आजी-माजी पदाधिकारी, पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजित गव्हाणे यावेळी म्हणाले, प्रत्येक बुथ कार्यकर्त्यांनी गांभीर्याने घेऊन निवडणुकीची जबाबदारी पार पाडायची आहे. निवडणुकीची लढाई ही नेहमी कार्यकर्त्यांच्या जीवावर लढली जाते. कार्यकर्ते हाच निवडणुकीचा खरा कणा असतो. आपली बुथ यंत्रणा सक्षम आहे मात्र आता केंद्रप्रमुख या संरचनेप्रमाणे आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचे आहे. राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजले असून राज्यात निवडणुका देखील जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे एकजुटीने कामाला लागायचे आहे.

कोट

भोसरी मतदारसंघांमध्ये परिवर्तनाची लढाई आपण सुरू केली असल्याचे सांगून अजित गव्हाणे म्हणाले, भोसरी मतदारसंघातील भ्रष्टाचार, दडपशाही यामुळे येथील प्रत्येक नागरिक कंटाळलेला आहे. येथील प्रत्येक कामातील भ्रष्टाचार अनेक गैरसोयींसाठी कारणीभूत ठरत आहे. मतदार संघातील चहुबाजूच्या वाहतूक कोंडीने अक्षरशः येथील नागरिक मेटाकुटीला आला आहे..या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला परिवर्तन घडवायचे  अाहे.

  • -अजित गव्हाणे
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
30.6 ° C
30.6 °
30.6 °
28 %
3.2kmh
0 %
Fri
30 °
Sat
31 °
Sun
33 °
Mon
33 °
Tue
33 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!