26.8 C
New Delhi
Tuesday, August 26, 2025
HomeTop Five Newsमंदिरात दर्शनासाठी भाविकांना आता 'ड्रेस कोड'

मंदिरात दर्शनासाठी भाविकांना आता ‘ड्रेस कोड’

सिद्धिविनायक मंदिर'; न्यासचा मोठा निर्णय

मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिर sidhivinyak mandir न्यासने एक मोठा निर्णय घेतला असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ड्रेस कोड लागू केला आहे. सिद्धीविनायकाच्या दर्शनाला जायचं असेल तर तेथील ड्रेस कोड dresscode नियमाची माहिती असायला हवी. अन्यथा तुम्हाला प्रवेश नाकारला जाऊ शकतो. सिद्धीविनायक मंदिर न्यासकडून ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. काही भाविकांच्या तक्रारींनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे न्यासच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर प्लास्टिक बंदीचाही निर्णय घेण्यात आला आहे.

दर्शन घेताना अन्य भाविकांना आपल्या कपड्यांमुळे संकोच वाटणार नाही असे कपडे भाविकांनी मंदिर परिसरात परिधान करावे, असे न्यासाने म्हटले आहे. तसेच भारतीय पारंपारिक वेशभूषा किंवा अंगभर कपडे घातले पाहिजेत अशीही सूचना देण्यात आली आहे. अंगभर कपडे घातलेल्या भाविकांनाच सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार आहे, असे न्यासनं प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे. 

श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासची बैठक पार पडली. या बैठकीत काय निर्णय झाला याची माहिती न्यासचे सदस्य राहुल लोंढे यांनी माध्यमांना दिली. राहुल लोंढे यांनी सांगितले की, विश्वस्तांच्या बैठकीत मंदिर परिसरात व दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. काही भक्तांच्या तक्रारी, तर काहींच्या सूचना न्यासकडे आल्या होत्या. मंदिरात येणाऱ्या काही भाविकांचे मग ते कोणत्याही जातीचे, धर्माचे व पंथाचे असोत, स्त्री किंवा पुरुष असोत त्यांचे पेहराव अन्य नागरिकांना संकोच वाटेल असे होते. त्यामुळे पेहरावाबाबत नियम लादले आहेत. पुढच्या आठवड्यापासून सिद्धिविनायक मंदिरात येणारा जो भक्त असेल, त्याचा पेहराव शालीनता आणि मंदिराचे पावित्र्य जपणारा असावा. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
26.8 ° C
26.8 °
26.8 °
87 %
5kmh
100 %
Mon
26 °
Tue
34 °
Wed
35 °
Thu
36 °
Fri
29 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!