10.1 C
New Delhi
Thursday, November 27, 2025
HomeTop Five Newsमिशन विधानसभा निवडणूक : भोसरी माझी आई, तर चऱ्होली मावशी…!

मिशन विधानसभा निवडणूक : भोसरी माझी आई, तर चऱ्होली मावशी…!

भाजपा आमदार महेश लांडगे यांचा विजयाचा निर्धार


– माजी महापौर नितीन काळजे यांच्यासह ग्रामस्थांची वज्रमूठ

पिंपरी –
‘‘जन्मदाती आईनंतर जास्त प्रेम देते, आपुलकीने जपते, जगायला शिकवते ती मावशी म्हणूनच भोसरी माझी आई; तर चऱ्होली माझी मावशी आहे. माझ्या राजकीय वाटचालीमध्ये चऱ्होलीकरांनी कायम साथ दिली. माझे जीवाभावाचे सहकारी यांच्या सोबतीने चऱ्होलीतील ग्रामदैवत श्री. वाघेश्वर महाराज यांचा आशिर्वाद घेतला आणि निवडणूक प्रचाराला सुरुवात करण्यात आली. ‘‘जब साथ हो मेरे दोस्त…तो संघर्षपथपर विजय निश्चित हैं..! ’’ याची अनुभूती येते आहे. अत्यंत सकारात्मक- मंगलमय वातावरणात निवडणुकीचा प्रचार सुरू आहे’’, अशा भावना भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या आहेत.

भोसरी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आमदार लांडगे यांनी चऱ्होली गावचे ग्रामदैवत श्री. वाघेश्वर महाराज मंदिरात दर्शन घेवून प्रचाराला सुरूवात केली. यावेळी माजी महापौर नितीन काळजे, माजी महापौर राहुल जाधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी महापौर नितीन काळजे म्हणाले की, आम्ही महेश लांडगेंसोबत २०१४ साली गेलो. त्यावेळी कोणतीही अपेक्षा न ठेवता गेलो होतो. महानगरपालिकेत पहिल्यांदा भाजपाची सत्ता आली. २०१७ मध्ये मला महापौरपदाची संधी मिळाली. मी नितिमत्ता जपणारा माणूस आहे. चऱ्होलीला, मला एव्हढे मोठे पद महेश लांडगे यांच्यामुळेच मिळाले.

महापालिकेत चऱ्होली गावचा समावेश झाला. १७ वर्षे साधा डीपी रस्ता करता आला नाही. पूर्वीची परिस्थिती काय होती, हे चऱ्होलीकरांना माहिती आहे. २०१७ मध्ये आमदार महेश लांडगेंच्या माध्यमातून चऱ्होली गावाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. विकासाच्या बाबतीत चऱ्होलीचे नाव पंचक्रोशीत निघते. त्यामुळे २०१४ मध्ये ज्याप्रमाणे चऱ्होली निर्णायक ठरली, तसेच २०२४ मध्येसुद्धा चऱ्होलीकर निर्णायक भूमिका बजावतील. या परिसरातून महेश लांडगे यांना सर्वाधिक मतदान होईल, असा दावाही माजी महापौर नितीन काळजे यांनी केला आहे.

**

माझ्या राजकीय संघर्षाच्या काळात चऱ्होलीकरांनी दिलेला आधार कदापि विसरु शकत नाही. विकासाच्या मुद्यांवर आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे. गेल्या १० वर्षांत चऱ्होलीसह समाविष्ट गावांच्या विकासाला चालना दिली. समाविष्ट गावांमध्ये दोन महापौरांसह विविध मानाची पदे दिली. भूमिपुत्रांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न केले आहेत. चऱ्होलीतील भूमिपुत्र बांधकाम व्यावसायिक घडले. याचा अभिमान वाटतो. रस्ते, पायाभूत सोयी-सुविधा निर्माण झाल्या. त्यामुळे चऱ्होलीचा चेहरामोहरा बदलला आहे. मतदार संघातील नागरिकांना अभिमान वाटावा, असे काम करीत राहीन.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
10.1 ° C
10.1 °
10.1 °
87 %
1kmh
0 %
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °
Mon
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!