28.1 C
New Delhi
Friday, September 19, 2025
HomeTop Five Newsराज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर

राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर

मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना वेग आला असून ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठी आरक्षणाची यादी जाहीर करण्यात आली आहे. ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींसाठीच्या आरक्षणाबाबत राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये विविध समाज घटकांसह महिलांसाठी मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राखीव ठेवण्यात आले आहे.

राज्यात सर्वच पक्षांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाची यादीमुळे इच्छुकांना बळ मिळणार आहे. तसेच महिला आरक्षणामुळे अनेक जिल्ह्यांत नवीन नेतृत्वालाही संधी मिळणार आहे.

विभागनिहाय जिल्हा परिषदांचे आरक्षण

कोकण

ठाणे – सर्वसाधारण महिला
पालघर – अनुसूचित जमाती
रायगड – सर्वसाधारण
रत्नागिरी – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सिंधुदूर्ग – सर्वसाधारण

विदर्भ

नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
अमरावती – सर्वसाधारण (महिला)
अकोला – अनुसूचित जमाती (महिला)
बुलढाणा – सर्वसाधारण
वाशिम – अनुसूचित जमाती (महिला)
यवतमाळ – सर्वसाधारण
वर्धा – अनुसूचित जाती
चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)
भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग
गोंदिया – सर्वसाधारण (महिला)
गडचिरोली – सर्वसाधारण (महिला)

मराठवाडा

छत्रपती संभाजीनगर – सर्वसाधारण
जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
परभणी – अनुसूचित जाती
बीड – अनुसूचित जाती (महिला)
धाराशिव – सर्वसाधारण (महिला)
लातूर – सर्वसाधारण (महिला)
नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
हिंगोली – नागरिकांचा मागास प्रवर्ग

उत्तर महाराष्ट्र

नाशिक – सर्वसाधारण
अहिल्यानगर – अनुसूचित जमाती (महिला)
जळगाव – सर्वसाधारण
धुळे – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
नंदुरबार – अनुसूचित जमाती



पश्चिम महाराष्ट्र

पुणे – सर्वसाधारण
सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
सातारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सांगली – सर्वसाधारण (महिला)
कोल्हापूर – सर्वसाधारण (महिला)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
28.1 ° C
28.1 °
28.1 °
83 %
0kmh
40 %
Fri
33 °
Sat
38 °
Sun
38 °
Mon
38 °
Tue
36 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!