27.8 C
New Delhi
Thursday, June 19, 2025
HomeTop Five Newsविठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची २६ डिसेंबरपासून ऑनलाईन नोंदणी

विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची २६ डिसेंबरपासून ऑनलाईन नोंदणी

दि. 01 जानेवारी ते 31 मार्च, 2025 मधील पुजांची होणार नोंदणी

घरबसल्या करता येणार पुजेची नोंदणी,

पंढरपूर – श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्यपुजा, पाद्यपूजा, तुळशी पूजा, चंदन उटी पूजा इत्यादी पूजा श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात. दि. 01 जानेवारी ते 31 मार्च, 2025 या कालावधीतील पुजांची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करण्याची सुरवात दि.26 डिसेंबर रोजी स.11.00 पासून होत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

       याबाबत मंदिर समितीच्या दि. 20 ऑगस्ट रोजीच्या सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत निर्णय घेण्यात आला होता. यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. भाविकांना पूजेची नोंदणी https://www.vitthalrukminimandir.org या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे. 

यापूर्वी पहिल्या टप्प्यात दि. 7 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीतील श्रींच्या नित्यपूजा, तुळशीपूजा व पाद्यपूजा ऑनलाइन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून व देशभरातून कर्नाटक, आसाम, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातील भाविकांनी पूजेची नोंदणी केली होती. यास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

घरबसल्या करता येणार आता पूजेची नोंद!

आता, दुस-या टप्प्यात दि. 01 जानेवारी ते 31 मार्च, 2025 या कालावधीतील सण, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशीच्या श्रींच्या नित्यपूजा, तुळशीपूजा व पाद्यपूजा ऑनलाइन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ऑनलाइन नोंदणीसाठी काही अडचणी आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयातून नोंदणी करून देण्यास मदत व आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येईल. याबाबतची अधिक माहिती, अटी व शर्ती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी मंदिर समितीच्या 02186 -299299 या दूरध्वनी क्रमांकावर भाविकांनी संपर्क साधावा असे आवाहन व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
27.8 ° C
27.8 °
27.8 °
82 %
3.9kmh
90 %
Thu
36 °
Fri
37 °
Sat
37 °
Sun
38 °
Mon
37 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!