पुणे- शिक्रापूर चाकण रस्ता नेहमी वेगवेगळ्या अपघातामुळे चर्चेत येत असताना नुकतेच चाकण बाजूने येणाऱ्या मद्यधुंद कंटेनर चाकालाने अनेक वाहनांना धडक देत मध्ये पोलिसांच्या वाहनाला धडकून थेट शिक्रापूर जवळील जातेगाव खुर्द गाठले अखेर शिक्रापूर पोलिसांना नागरिकांच्या मदतीने सदर कंटेनर चालकाला रोखण्यात यश आले मात्र जमलेल्या जमावाने सदर कंटेनर चालकाला बेदम मारहाण केल्याने त्याला उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
चाकण शिक्रापूर रस्त्याने टाटा कंपनीच्या कार घेणून जाणारा एच आर ५५ ए व्ही २२८३ हा कंटेनर चाललेला असताना कंटेनर चालकाने चाकण दोन इसमांना धडक देत कंटेनर पुढे आला, यावेळी नागरिकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तो तसाच पुढे जात काही वाहनांना धडक देत पुढे येत राहिला, बहुळ गावाजवळ चाकण पोलिसांनी त्या कंटेनर चालकाला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याने थेट पोलिसांच्या वाहनाला धडक देत पुढे गेला, त्यांनतर साबळेवाडी मधून कंटेनर चालकाने पुन्हा चाकण बाजूकडे वळण घेत पुन्हा थेट शिक्रापूरकडे निघत करंदी चौफुला येथे एका पिकअप सह एका युवतीला धडक देऊन जातेगाव खुर्द जवळ एका डंपरला ठोस दिली, सदर थरार वेळी चाकण पासून अनेक युवकांनी कंटेनरचा दुचाकीहून कंटेनरचा पाठलाग केला, यावेळी शिक्रापूर पोलीस व नागरिकांच्या मदतीने त्याला रोखण्यात यश आले, मात्र यावेळी जमलेल्या नागरिकांनी कंटेनरचालकाच्या दिशेने तुफान दगडफेक केली, यावेळी पोलीस शिपाई लखन शिरसकर यांनी दगडफेक व चालकाला काठ्यांनी मारहाण सुरु असताना शिताफीने कंटेनरच्या आतमध्ये जात चावी काढून घेतली असता जमावाने चालकाला खाली घेत बेदम मारहाण केली, यावेळी सदर चालकाला जबर मारहाण झाल्याने त्याला उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले, यावेळी रस्त्यांच्या दोन्ही बाजूने मोठी वाहतूककोंडी झाली, दरम्यान शिक्रापूर व चाकण पोलीस स्टेशन सह पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी वाहतूककोंडी बाजूला करत कंटेनर वाहतूककोंडी सुरळीत केली, यावेळी सदर कंटेनर चालकाचे नाव आकीब अब्दुल रज्जाक वय २४ वर्षे रा. पचंका जि. पलवल राज्य हरियाना असल्याचे समोर आले, तर या अपघातात तब्बल वीस ते पंचवीस वाहनांचे नुकसान झाले असल्याचे बोलले जात आहे मात्र यावेळी सदर संपूर्ण घटनेचा रात्री उशिरा पर्यंत पंचनामा होऊन अपघातात किती वाहनांचे नुकसान व किती जखमी हे समजू शकेल असे पोलिसांनी सांगितले आहे.
चाकण शिक्रापूर रस्त्यावर कंटेनरच्या थरार मध्ये जातेगाव येथे कंटेनर थांबल्यानंतर संतप्त जमावाने कंटेनर पेटवून देण्याचा निर्णय घेतला मात्र यावेळी पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी जमाव बाजूला करत घटनेवर नियंत्रण आणल्याने थोडक्यात कंटेनर सह त्यामध्ये असलेल्या टाटा कंपनीच्या तीन ते पाच नवीन कार बचावल्या आहे.
मद्यधुंद चालकाचा पंचवीस किलोमीटर थरार . . . . . .
चाकण शिक्रापूर रस्त्यावर कंटेनरने केलेल्या अपघातामध्ये चाकण पासून शिक्रापूर जवळील जातेगाव खुर्द गावाजवळ कंटेनर आला मात्र या पंचवीस किलोमीटर अंतरात त्याने पोलिसांच्या वाहनासह पंचवीस वाहनांना धडक दिल्याने नागरिकांना मद्यधुंद चालकाचा पंचवीस किलोमीटर थरार पाहण्यास मिळाला आहे.