34.1 C
New Delhi
Tuesday, September 9, 2025
HomeTop Five Newsशिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा पुणे गणेश वंदन दौरा

शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा पुणे गणेश वंदन दौरा

“सार्वजनिक गणेशोत्सव ही लोकमान्य टिळकांची प्रेरणादायी परंपरा आहे; समाजसेवा व भक्तिभावाचा अद्वितीय संगम” — डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे, — महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पुणे शहरातील मानाच्या गणपती मंडळांचा व प्रमुख ऐतिहासिक मंडळांचा दौरा करून गणरायाचे दर्शन घेतले. या दौऱ्यात त्यांनी श्री कसबा गणपती, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती, श्री दत्त मंदिर, श्री मंडई गणपती, श्री तांबडी जोगेश्वरी, श्री गुरुजी तालीम गणपती, श्री तुळशीबाग गणपती आणि श्री गणेश केसरी वाडा येथे भेट देत दर्शन घेतले.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “सन्माननीय लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा आजही समाजात भक्तिभाव, सामाजिक ऐक्य व सेवाभाव वाढवण्याचे कार्य करत आहे. पुण्यासह महाराष्ट्रभर हजारो गणेशभक्त या निमित्ताने एकत्र येतात, आणि लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांना श्री गणेश आपल्याकडून चांगले कार्य घडवण्यासाठी प्रेरणा देतात.”

केसरी वाडा गणपती मंडळाचे दर्शन घेतले त्यावेळी केसरीचे सरव्यवस्थापक श्री. रोहित टिळक हे आवर्जून उपस्थित होते. डॉ. गोऱ्हे यांनी त्यांच्या फिजिओथेरपी शिबिरासारख्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. विविध गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित ‘योद्धा’ हे पुस्तक भेट दिले व त्यांचा सत्कारही केला. सामाजिक सेवेच्या परंपरेला पुढे नेण्यासाठी, “गणपती मंडळांना वर्षभर सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी योजना आखण्याचा माझा मानस आहे व त्याबाबत लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे,” असेही त्यांनी सांगितले.

या दौऱ्यात त्यांच्या सोबत भगिनी व स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी प्रमुख उपस्थित होत्या. तसेच, शिवसेना महिला आघाडीच्या सुदर्शना त्रिगुणाईत, सुरेखा कदम पाटील, अनिता परदेशी, कांताताई पांढरे, सारिका पवार, मनीषा परांडे, मीनल धनवटे, वैजयंती पाचपुते व किरण साळी (सचिव युवा सेना, महाराष्ट्र राज्य), आनंद गोयल (शहर संघटक, पुणे), राजू वीटकर (झोपडपट्टी विकास प्रमुख), नितीन पवार (उपशहर प्रमुख, कोथरूड) आणि शिवसेनेचे तसेच युवा सेनेचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “राज्य सरकार व केंद्र सरकार या प्रश्नावर सकारात्मक दृष्टीकोन ठेवत आहेत. कोणाच्याही हक्कांवर गदा न आणता सर्व समाजघटकांना न्याय मिळावा हीच माझी गणरायाकडे प्रार्थना आहे.”
तसेच, येत्या महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढविण्याचा संकल्प असल्याचेही त्यांनी नमूद केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
34.1 ° C
34.1 °
34.1 °
45 %
3.6kmh
7 %
Tue
36 °
Wed
36 °
Thu
36 °
Fri
36 °
Sat
37 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!