14.1 C
New Delhi
Monday, December 23, 2024
HomeTop Five Newsशिवसेनेची पहिली यादी जाहीर

शिवसेनेची पहिली यादी जाहीर

मनसेने आपल्या ४५ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर त्यापाठोपाठ आता शिवसेनेने आपली पाहिली यादी जाहीर केली आहे. ४५ उमेदवारांची पहिली यादी पक्षाने रात्री ११.३० वाजता जाहीर केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून पुन्हा रिंगणात उतरणार आहेत. तर साक्री (अज) विधानसभा मतादरसंघातून श्रीमती मंजुळाताई तुळशीराम गावित, चोपड्यातून चंद्रकांत बळवंत सोनावणे, जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव पाटील, एरंडोलमधून अमोल पाटील, पाचोऱ्यातून किशोर पाटील, मुक्ताईनगरमधून चंद्रकांत निंबा पाटील, बुलढाण्यातून संजय गायकवाड, मेहकरमधून डॉ. संजय रायमुलकर, दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून अभिजीत अडसूळ हे निवडणूक लढतील.

पुढे रामटेक मतदारसंघातून आशिष जैस्वाल, भंडाऱ्यातून नरेंद्र भोंडेकर, दिग्रसमधून संजय राठोड, नांदेड उत्तरमधून बालाजी कल्याणकर, कळमनुरीमधून संतोष बांगर, जालन्यातून अर्जून पंडितराव खोतकर, सिल्लोडमधून अब्दुल सत्तार, छत्रपती संभाजी नगरमधून प्रदीप जैस्वाल, छत्रपती संभाजी नगर (पश्चिम) मतदारसंघातून संजय शिरसाट, पैठणमधून विलास भूमरे, वैजापूरमधून रमेश बोरनारे, नांदगावमधून सुहास कांदे, मालेगावमधून दादाजी भुसे, ओवळा माजीवडा मतदारसंघातून प्रताप बाबूराव सरनाईक, मागाठाणेमधून प्रकाश सुर्वे, जोगेश्वरी पूर्वमधून मनिषा वायकर, चांदिवली मतदारसंघातून दिलीप लांडे, कुर्ला मतदारसंघातून मंगेश अनंत कुडाळकर, माहीमधून सदा सरवणकर, भायखळ्यातून यामिनी जाधव तर कर्जतमधून महेंद्र थोरवे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.

यासह अलिबाग मतदारसंघातून महेंद्र दळवी, महाडमधून भरतशेठ गोगावले, उमरगामधून ज्ञानराज चौगुले, परांडा मतदारसंघातून तानाजी सावंत, सांगोल्यातून शहाजी पाटील, कोरेगावमधून महेश शिंदे, पाटणमधून शंभूराज देसाई, दापोलीतून योगेश कदम, रत्नागिरी मतदारसंघातून उदय सामंत, राजापूर मतदारसंघातून किरण सामंत, सावंतवाडीतून दीपक केसरकर, राधानगरी मतदारसंघातून प्रकाश आबिटकर, करविर मतदारसंघातून चंद्रदीप नरके तर खानापूर मतदारसंघातून सुहास बाबर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे.

महायुतीमध्ये भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर मंगळवारी शिवसेनेने ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुंबई, मराठवाडा, कोकण, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघांचा समावेश आहे. महायुतीमध्ये अजूनही काही जागांवरुन एकमत होत नसल्याची माहिती आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यादी बुधवार किंवा गुरुवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
smoke
14.1 ° C
14.1 °
14.1 °
72 %
2.1kmh
0 %
Sun
16 °
Mon
19 °
Tue
22 °
Wed
23 °
Thu
23 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!