29.2 C
New Delhi
Friday, August 29, 2025
HomeTop Five Newsश्री संत निवृत्तीनाथांची पालखी पंढरीकडे रवाना

श्री संत निवृत्तीनाथांची पालखी पंढरीकडे रवाना

आषाढी वारीची तिसरी मानाची पालखी वारीसाठी मार्गस्थ

Aashadhi Wari 2025- त्र्यंबकेश्वर – आषाढी वारी २०२५ चा शुभारंभ संत निवृत्तीनाथांच्या पालखी प्रस्थानाने अधिक मंगलमय झाला. वारीत तिसऱ्या मानाची असलेली ही पालखी त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे रवाना झाली. हजारो वारकऱ्यांच्या “ज्ञानोबा माऊली तुकाराम च्या गजरात, दुपारी २ वाजता पालखीचा प्रस्थान सोहळा सुरू झाला.पंढरपूर आषाढी एकादशीसाठी ही पालखी २७ दिवसांचा पायी प्रवास करत पंढरीस पोहोचणार आहे. पालखीत संत निवृत्तीनाथ यांची प्रतिमा, पवित्र पादुका आणि पारंपरिक चांदीचा रथ यांसह दिंडी सोबत निघाली आहे.वार्षिक परंपरेप्रमाणे, प्रस्थानापूर्वी तीर्थराज कुशावर्तावर त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्यावतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी गोदावरी स्नान व जलाभिषेक करून संत निवृत्तीनाथांच्या पादुकांना पूजन करण्यात आले.या दिव्य वारीमध्ये, भक्ती, शिस्त आणि समर्पण यांचे दर्शन होते. आता पुढील काही दिवसांत पालखी विविध गावांतून मार्गक्रमण करत, इतर संतांच्या पालख्या पंढरपूरला भेटतील.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
29.2 ° C
29.2 °
29.2 °
70 %
4.8kmh
100 %
Fri
29 °
Sat
35 °
Sun
35 °
Mon
29 °
Tue
30 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!