12.1 C
New Delhi
Monday, December 23, 2024
HomeTop Five Newsसंदीप खर्डेकर यांची पुणे शहर व जिल्ह्यातील विधानसभेसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती 

संदीप खर्डेकर यांची पुणे शहर व जिल्ह्यातील विधानसभेसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती 

पुणे – प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर यांची पुणे शहर व जिल्ह्यातील विधानसभेसाठी समन्वयक म्हणून  नियुक्ती केली आहे. महायुतीतील सर्व घटक पक्षांमध्ये योग्य समन्वय राखत पुणे महानगर, पुणे ग्रामीण जिल्हा समन्वयक म्हणून विधानसभेच्या सर्व एकवीस जागा जिंकण्याचा मी संकल्प केला आहे, असे संदीप खर्डेकर म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर यांची पदावर नियुक्ती केल्याचे जाहीर केल्यावर संदीप खर्डेकर यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मी पंचवीस वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून कार्यरत असून, पुणे शहर प्रचार प्रसिद्धी प्रमुख, पुणे शहर भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष, शहर उपाध्यक्ष, शहर सरचिटणीस अशा पदांवर काम केले आहे.

सध्या प्रदेश प्रवक्ता म्हणून जबाबदारी पार पाडत असताना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे, बारामती व शिरूर मतदारसंघात महायुतीचा समन्वयक म्हणून काम केले आहे. दरम्यान, विद्यमान लोकप्रतिनिधी, प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संपर्कात असून महायुतीचे उमेदवार जाहीर झाल्यावर प्रत्येक मतदारसंघात महायुतीचे मेळावे, बैठका घेऊन सर्व एकवीस उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करेन, असेही खर्डेकर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
12.1 ° C
12.1 °
12.1 °
82 %
3.1kmh
40 %
Mon
19 °
Tue
22 °
Wed
23 °
Thu
23 °
Fri
21 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!