मुंबई- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं आज ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मात्र, काही वेळातच झालेल्या महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत या यादीत प्रशासकीय चूक असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. त्यामुळं ही यादी अंतिम आहे की यातील उमेदवारांच्या नावात काही बदल होणार आहे याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं जाहीर केलेल्या यादीत काही वादग्रस्त जागांचाही समावेश आहे. यातील काही जागांवर काँग्रेसनं तर काही जागांवर अन्य छोट्या पक्षांनी दावा केलेला आहे. त्यामुळं उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्या यादीत काही दुरुस्त्या आहेत. त्यात काही प्रशासकीय चुका आहेत. हे कसं झालं हे आम्ही उद्या तपासून पाहू आणि त्यावर नव्यानं चर्चा करू, असं संजय राऊत म्हणाले. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये प्रत्येकी ८५ जागांवर पूर्ण एकमत झालं आहे. इतर छोट्या पक्षांनाही सामावून घेणारं जागावाटप पूर्ण झालेलं आहे. २७० जागांवर आमची सहमती झाली आहे. त्याची यादीही बनवण्यात आली आहे. उरलेल्या जागांवर आमच्या मित्रपक्षांसोबत चर्चा सुरू होईल. अशा पद्धतीनं महाविकास आघाडी २८८ जागा पूर्ण ताकदीनं लढेल, असं राऊत यांनी सांगितले.
६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर पण संभ्रम निर्माण?
RELATED ARTICLES
New Delhi
overcast clouds
33.8
°
C
33.8
°
33.8
°
54 %
5.3kmh
98 %
Wed
34
°
Thu
30
°
Fri
35
°
Sat
35
°
Sun
33
°