20.1 C
New Delhi
Thursday, March 19, 2026
HomeTop Five Newsउपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघातात निधन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघातात निधन

pune | बारामती येथे बुधवारी सकाळी एक भीषण आणि धक्कादायक विमान अपघात झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेऊन येणारे खासगी विमान बारामती एमआयडीसी परिसरातील विमानतळावर लँडिंगदरम्यान दुर्घटनाग्रस्त झाले. या अपघातात विमानातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज बारामती तालुक्यात उपमुख्यमंत्री पवार यांच्या चार प्रचारसभा नियोजित होत्या. त्या अनुषंगाने ते मुंबईहून सकाळी विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. विमान उतरण्याच्या प्रक्रियेत असताना तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता वर्तवली जात असून, अपघाताचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होईल, असे प्रशासनाने सांगितले आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, वैद्यकीय पथके आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, जखमींना त्वरित नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातात विमानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

दरम्यान, विमान वाहतूक विभाग आणि तांत्रिक तपास पथक घटनास्थळी पोहोचले असून, रनवेची स्थिती, हवामानातील घटक तसेच विमानातील तांत्रिक यंत्रणांची सखोल तपासणी सुरू आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
mist
20.1 ° C
20.1 °
20.1 °
77 %
1kmh
75 %
Thu
31 °
Fri
21 °
Sat
29 °
Sun
32 °
Mon
33 °

Most Popular

Recent Comments