26.1 C
New Delhi
Thursday, November 20, 2025
HomeTop Five Newsभाजपा शहर निवडणुकीची कमान आता आमदार अमित गोरखे यांच्या हाती..!

भाजपा शहर निवडणुकीची कमान आता आमदार अमित गोरखे यांच्या हाती..!

पिंपरी चिंचवड जिल्हा निवडणूक संचालन समितीच्या संयोजक पदी आमदार अमित गोरखे तर सहसंयोजक म्हणून मोरेश्वर शेडगे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्शभूमीवर निवडणूक कालखंडात संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबविणे तसेच उमेदवारांच्या मुलाखती त्यासाठी उमेदवार चयन करणे व निवडणूक प्रचार यंत्रणा कार्यान्वित करणे यासाठी जिल्हा निवडणूक संचालन समितीची भूमिका अत्यंत महत्वाची असते.
राजकीय व संघटनात्मक दृष्ट्या अशा महत्वपूर्ण समितीच्या संयोजक पदी आमदार अमित गोरखे यांची प्रदेश भाजपाने निवड करून त्यांच्या वर मोठा विश्वास व्यक्त केला आहे.

या संचालन समिती मधे सहसंयोजक पदी संगठन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
पक्षाचा जाहीरनामा प्रमुख म्हणून अमोल देशपांडे यांची तर महायुती मित्र पक्ष समन्वयक म्हणून सदाशिव खाडे, प्रचार यंत्रणा समन्वयक म्हणून विजय फुगे, निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून राजेश पिल्ले, विरोधकांसाठी आरोप पत्र प्रमुख म्हणून विलास मडीगेरी, सामाजिक संपर्क प्रमुख म्हणून विकास डोळस, विशेष संपर्क प्रमुख संजय मंगोडेकर, युवा संपर्क प्रमुख दिनेश यादव, महिला संपर्क प्रमुख वैशाली खाडे, मिडिया समन्वयक म्हणून संजय पटनी, लाभार्थी संपर्क समन्वयक म्हणून गोपाळ माळेकर यांसोबतच या समितीत राजू दुर्गे, सत्यनारायण चांडक, मधुकर बच्चे, संजय परळीकर, गोरक्षनाथ झोळ, राजू मासुळकर, गुलाब बनकर, अमेय देशपांडे, सचिन राऊत, भूषण जोशी या पदाधिकाऱ्यांना महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

अमित गोरखे यांच्या निवडीचे पक्ष कार्यकर्त्यांबरोबरच सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे व विशेष महत्वाचे म्हणजे या निवडीला भाजपची मातृसंस्था असलेल्या संघ वर्तुळातूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
26.1 ° C
26.1 °
26.1 °
38 %
2.1kmh
0 %
Thu
26 °
Fri
27 °
Sat
27 °
Sun
26 °
Mon
26 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!