23.1 C
New Delhi
Wednesday, November 26, 2025
HomeTop Five Newsपिंपरी-चिंचवड मनपा निवडणूक: 'स्वबळ' की 'युती'? कोअर कमिटी ठरवणार

पिंपरी-चिंचवड मनपा निवडणूक: ‘स्वबळ’ की ‘युती’? कोअर कमिटी ठरवणार

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची स्पष्टोक्ती

​पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची आगामी निवडणूक भारतीय जनता पक्षाने एकट्याने लढायची की युती करून, याचा निर्णय स्थानिक परिस्थिती पाहून शहर भाजपची कोअर कमिटी घेईल, आणि त्यानंतर वरिष्ठ पातळीवर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे मोठे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. ​शनिवारी, चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पिंपरी-चिंचवड शहर भाजपचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.

​यावेळी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या अध्यक्षतेत व प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटन मंत्री मकरंद देशपांडे, आमदार महेश लांडगे, निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप, पिंपरी चिंचवड निवडणूक संचालन समितीचे संयोजक आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप, संघठन सरचिटणीस अॅड.मोरेश्वर शेडगे,विकास डोळस,वैशाली खाडेय,मधुकर बच्चे,यांसह माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, उषा ढोरे, प्रदेश सदस्य सदाशिव खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचे सर्व नगरसेवक- नगरसेविका, हजारो पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

प्रसंगी, बजरंग दलाचे विभाग पुणे विभाग संयोजक कुणाल साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (राकांपा) माजी नगरसेवक अरुण टाक, श्रीमती आशाताई सोदाई, मावळ तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष हेमंत राऊत, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते जगदीश येवले, प्रभाग क्रमांक १७ चिंचवडे नगर येथील धनंजय आंबुसकर, संत तुकाराम नगर प्रभागातील डॉ. संदीप बागडे, प्रभाग क्रमांक १४ संतोष चौगुले, पिंपळे सौदागर येथील प्रसिद्ध उद्योजक संदीप काटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच यावेळी महिला मोर्चा, युवा मोर्चा, ओबीसी मोर्चा, कायदा आघाडी, शहरातील सर्व मंडले व विविध आघाडीच्या कार्यकारिणीची घोषित करण्यात आली.

​प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, “भाजपचे कार्यकर्ते वैचारिक भूमिका घट्ट धरून आहेत आणि ते पक्षाचा राष्ट्रवादी मोठा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारताची ओळख जगभर पोहोचली आहे. फक्त भाजप हाच पक्ष देशाच्या हिताचा विचार करणारा अजेंडा घेऊन चालतो. बाकीच्या प्रादेशिक पक्षांचा अजेंडा हा कुटुंबावर आधारित असतो. आपला अजेंडा देश आणि देशाच्या फायद्यासाठी आहे.”​त्यांनी कार्यकर्त्यांना ‘बूथ’वर ५१ टक्के मतांची लढाई लढण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आणि ‘भारत माता की जय, वंदे मातरम’ चा मंत्र प्रत्येकाच्या मनात पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यास सांगितले.

‘शंभर पार’चा नारा आणि स्थानिक नेत्यांचा आग्रह

​प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी सांगितले, “शहरात भाजपला मोठी ताकद मिळाली आहे. मनपा निवडणुकीत १०० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येतील आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचाच महापौर होईल. त्यासाठी मतदारांपर्यंत पोहोचून पदवीधर मतदार नोंदणी वाढवावी.”

​शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी ‘शंभर पार’चा नारा दिला व महानगरपालिका निवडणूक जिंकण्याचा संकल्प सोडला आणि शहराच्या विकासासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री यांनी जास्तीत जास्त अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे प्रास्ताविक
शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी केले तर सूत्रसंचालन संगठन सरचिटणीस अॅड.मोरेश्वर शेडगे यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
23.1 ° C
23.1 °
23.1 °
28 %
2.1kmh
0 %
Wed
24 °
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!