14.1 C
New Delhi
Thursday, November 27, 2025
HomeTop Five Newsक्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयाला केरळच्या राज्यपालांची सदिच्छा भेट

क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयाला केरळच्या राज्यपालांची सदिच्छा भेट


पिंपरी-चिंचवड ः  चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयाला केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांनी चापेकर स्मारकाची पाहणी करत समितीच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्यपाल आर्लेकर यांचा चापेकर स्मारक समितीच्या वतीने सन्मानचिन्ह, शाल देऊन गौरव करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग कार्यवाह मुकुंदराव कुलकर्णी, जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे, धर्म जागरण प्रमुख हेमंतराव हरहरे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कोषाध्यक्ष रवींद्र नामदे, सदस्य डॉ शकुंतला बन्सल, सुहास पोफळे, व्यवस्थापक अतुल आडे , मैथिली कुलकर्णी, सतिश अवचार, तसेच क्रांतिवीर चाफेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयातील सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित हाेते. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर म्हणाले, ”आम्ही इतिहासात जे वाचत हाेताे, ते आज प्रत्यक्षदर्शन आम्हाला घडले आहे. सुंदर अशा चापेकर वाड्यामध्ये परंपरा, संस्कृतीच्या अनेक छटा या पुन्हा बघण्यास मिळाल्या. चापेकर बंधूंनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान, त्याग याची छाेटीशी झलक बघता आली. देशांतील तरूणांनी चिंचवडमध्ये येऊन चापेकरांच्या स्मृतींना अभिवादन करावे. प्रेरणा घेऊन भारत मातेच्या उत्कषासाठी कायम प्रयत्न करत रहावेत”, असे आवाहनही त्यांनी केले. 

फाेटाे दिला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
14.1 ° C
14.1 °
14.1 °
72 %
0kmh
0 %
Wed
20 °
Thu
25 °
Fri
26 °
Sat
26 °
Sun
25 °

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!